जळगाव (प्रतिनिधी) येथील हुडको वसाहतीत राहणाऱ्या तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून सलग चार वर्षे एका तरुणीवर अत्याचार करत शरीर संबध प्रस्तापीत करुन मुल जन्माला घातले. पिडीतेने लग्नाचा तगादा लावला असता तरुणाने नकार दिला. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक असे की, पिडीतेने दिलेल्या तक्रारीत नमुद केल्या प्रमाणे, पिंप्राळा हुडको येथील रहिवासी अजय राजु भालेराव याने लग्नाचे वचन देत सलगी केली. पिडीतेवर अत्याचार करुन गर्भवती राहिल्यावर तीने बाळाला जन्म दिला. वर्ष २०१७ ते जुलै-२०२१ दरम्यान सलग तीनवर्षे शरीर संबध प्रस्थापीत केले पिडीतेने लग्नाचा तगादा लावल्यावर मात्र, अजय राजु भालेराव याने लग्नास नकार देत निघुन गेला. पिडीतेने दिलेल्या तक्रारीवरुन संशयित अजय भालेराव याच्या विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास राजेश शिंदे करत आहेत.
















