TheClearNews.Com
Thursday, March 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

तरुणांना रोजगाराच्या महत्त्वाच्या संधी हाताळण्यासाठी प्रशिक्षित करणे ही काळाची गरज : अमृत अभय बंग !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 11, 2023
in बोदवड, शिक्षण, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

बोदवड (प्रतिनिधी) मी माझ्या आयुष्यात काय करावे? या प्रश्नाचे उत्तर आपले करियर करत असतांना शोधणे महत्त्वाचे आहे ,असे परखड आणि तसेच भावनिक आवाहन ‘निर्माण ‘चे कार्यक्रमसंचालक अमृत अभय बंग यांनी केले. वैद्यकीय क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे समाजसेवक पद्मश्री सन्मानित डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग यांचे ते सुपुत्र आहेत .
बोदवड येथील कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी आभासी पद्धतीने बंग यांचे व्याख्यान घेण्यात आले. ‘निर्माण’ अर्थपूर्ण करिअरच्या शोधात ‘ या विषयावर घेण्यात आलेल्या सदर कार्यक्रमाचे आयोजन रेमेडियल व ब्रिज कोर्स समितीतर्फे करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. संस्थेचे चेअरमन मिठूलाल अग्रवाल यांच्या प्रोत्साहनातून घेण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक अरविंद चौधरी होते .यावेळी डॉ.रूपेश मोरे, सौ. कांचन दमाडे, नितेश सावदेकर, विशाल जोशी ,डॉ.वंदना नंदवे,डॉ.अमर वाघमोडे , डॉ.धीरेंद्रकुमार यादव, निलेश महाजन,प्राध्यापक बांधव आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ज्वलंत सामाजिक समस्या समजून घेण्याची आणि सोडवण्याची इच्छा आणि क्षमता असलेल्या तरुण व्यवसायिकांचा एक मोठा गट तयार करणे हे निर्माण चे उद्दिष्ट आहे. निर्माणतर्फे आयोजित शिबिरे, त्यांची निवडप्रक्रीयेविषयी विविध शिबिरार्थीचे कार्य याची माहिती दिली. केवळ व्यवस्थेला नाव न ठेवता त्यामधील कच्चे दुवे शोधून त्यावर करियर कसे करता येईल हे पाहणे गरजेचे आहे.यासाठी आशा सेविका ही संकल्पना निर्माण करणारे डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग यांचे कार्य उत्तम उदाहरण असल्याचे सांगितले. गडचिरोली सारख्या आदिवासी ग्रामीण भागात तेथील आरोग्य आणि शिक्षण समस्यांवर फार मोठे कार्य केलेले आहे. त्यांच्या संशोधनामुळे बालमृत्यूचे ,कुपोषणाचे व स्त्रियांच्या आजारांचे प्रमाण कमी झाले. नवजात बालमुत्यू रोखणारे हेच कृती मॉडेल पुढे पाकिस्तान नेपाळ बांगलादेश आणि साऊथ आफ्रिकेतील काही देशांमध्ये वापरले जात आहे. निर्माण संस्थेपासून प्रेरणा घेऊन अनेक तरुणांनी लोकांच्या समस्या सोडवत स्वतःची करिअरची वाट निवडली आहे,असे अनेक विचार स्वतःच्या खुमासदार शैलीत बंग यांनी विद्यार्थ्यासमोर व्यक्त केले. थेट विद्यार्थ्यांच्या वयोपातळीवर जाऊन बंग यांनी सुसंवाद साधल्याने विद्यार्थी वैचारिकदृष्ट्या ओतप्रोत झाले. विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांनाही सहजपणे उत्तरे दिली.

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 19 मार्च 2026 !

उन्हाच्या झळा कमी करण्यासाठी पुढाकार : जळगावात जलकुंड व परळ वाटपचा उपक्रम

प्रास्ताविकात डॉ.रुपेश मोरे यांनी दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील निर्माण व तिची पालकसंस्था सर्च , तारुण्याभान उपक्रम राबविणाऱ्या डॉ.राणी बंग यांच्याविषयी सखोल माहिती दिली. तसेच महात्मा गांधी व विज्ञानाला प्रेरणा मानणारे डॉ. अभय बंग, डॉ. राणी बंग यांच्या आदिवासी भागातील बालमृत्यू , व त्यावरील उपाययोजना, रोजगार हमी योजनेतील मजुरीचा दर याविषयी केलेल्या कार्याचा लेखाजोखा मांडला.आपल्या अध्यक्षीय भाषणात नवजात बालमुत्यूवरील डॉ. अभय बंग यांनी केलेला महत्त्वाचा रिसर्च पेपरमुळेच राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाव्दारे आशा सेविकांची निर्मिती झाली आहे. म्हणून तरुणांनी समाजोपयोगी संशोधन करावे असे आवाहनही प्राचार्य प्राध्यापक अरविंद चौधरी यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. रुपेश मोरे यांनी केले.सूत्रसंचालन डॉ. वंदना नंदवे आणि आभार प्रदर्शन विशाल जोशी यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी समीर पाटील, राजू मापारी, वैभव पाटील आणि महाविद्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 19 मार्च 2026 !

March 19, 2026
जळगाव

उन्हाच्या झळा कमी करण्यासाठी पुढाकार : जळगावात जलकुंड व परळ वाटपचा उपक्रम

March 18, 2026
जळगाव

लोकचित्रकलेचा प्रचार आवश्यक – दिपमाला काळे

March 18, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 18 मार्च 2026 !

March 18, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 17 मार्च 2026 !

March 17, 2026
सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 15 ते 21 मार्च 2026 !

March 15, 2026
Next Post

चोपडा पत्रकार बांधवातर्फे संदीप महाजन यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध ; हल्लेखोरांना अटक करण्याची मागणी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

संतापजनक : विवाहितेसह तरुणीबाबत अश्लिल मजकुर फेसबुकवर केला प्रसारीत ; जळगाव सायबर पोलिसात गुन्हा !

February 16, 2023

राज्यातील विविध पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ‘सर्वोत्कृष्ट अपराध सिद्धी’ पुरस्कार !

November 24, 2022

गुजरातमधील ड्रग्ज तस्करीचा तपास एनआयएकडे ; अमित शहांचे आदेश !

October 7, 2021

February 5, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group