भुसावळ (प्रतिनिधी) जळगाव जिल्ह्यातील पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश आज जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी काढले आहेत. नऊ अधिकार्यांच्या बदल्यांचे आदेश शनिवारी सायंकाळी उशिरा काढण्यात आलेत.
लाच प्रकरणात तत्कालीन निरीक्षक राहुल गायकवाड यांच्यासह तिघांवर कारवाई झाल्यानंतर 18 जुलैपासून पद रीक्त असल्याने भुसावळ बाजारपेठसाठी कुणाची नियुक्ती होणार? याबाबत उत्सुकता लागून होती. त्यानुसार आता भुसावळ बाजारपेठ पोलीस निरीक्षकपदी जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे बबन आव्हाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आव्हाड यांची डॅशिंग अधिकारी म्हणून पोलीस दलात प्रतिमा आहे. त्यामुळे भुसावळ शहरातील गुन्हेगारीवर भविष्यात मोठ्या कारवाया होण्याची शक्यता आहे.
जाणून घ्या…कुणाला मिळाले कुठलं पोलीस स्थानक !
नियंत्रण कक्षाचे सचिन सानप यांची पहूर पोलीस निरीक्षकपदी
नियंत्रण कक्षाचे विशाल जैस्वाल यांची जिल्हापेठ पोलीस ठाणे निरीक्षकपदी
नियंत्रण कक्षाचे बबन जगताप यांची सायबर पोलीस ठाणे निरीक्षकपदी
नियंत्रण कक्षाचे सुनील पवार यांची पारोळा पोलीस निरीक्षकपदी
नियंत्रण कक्षाचे अनिल भवारी यांची जळगाव शहर पोलीस निरीक्षकपदी
जिल्हापेठचे निरीक्षक बबन आव्हाड यांची भुसावळ बाजारपेठ पोलीस निरीक्षकपदी
जिविशा शाखेचे रंगनाथ धारबळे यांची शनीपेठ पोलीस ठाणे निरीक्षकपदी
भुसावळ तालुक्याचे विलास शेंडे यांची जिविशा शाखेत निरीक्षकपदी
भुसावळ वाचक तथा सहाय्यक निरीक्षक रुपाली चव्हाण यांची भुसावळ शहर वाहतूक शाखेत नियुक्ती करण्यात आली.
















