मुक्ताईनगर (प्रतिनिधी) इतर जिल्ह्यातील एका तरुणीवर मुक्ताईनगर येथे बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लग्नाच्या बहाण्याने मुक्ताईनगर येथील आरोपी तरुणीचे वारंवार शोषण करत राहिला. एवढेच नाहीतर संशयित आरोपीच्या घरच्यांनी तरुणीला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात भूषण संजयराव तायडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे
यासंदर्भात अधिक असे की, बाहेर जिल्ह्यातील एका तरुणी व संशयित आरोपी भूषण संजयराव तायडे (वय ३१ रा. मुक्ताईनगर ता. जि. जळगाव) या दोघांची hello you app वर online मैत्री झाली. त्यांच्या मैत्रीचे थोड्याच दिवसात रुपांतर प्रेमात झाले. संशयित आरोपी भूषण याने एकेदिवशी गाडी पाठवुन पिडीत तरुणीला मुक्ताईनगर येथे बोलावून घेतले. त्यानंतर दोघं जण इच्छादेवी मंदीरातील एका प्लास्टर न केलेल्या सिमेंटच्या रुममध्ये थांबले. यावेळी भूषण याने पिडीत तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शारिरीक संबंध प्रस्तापित केले. त्यानंतर भूषणच्या घरच्यांनी मंदिरात येवून लग्नास विरोध केल्याने भूषण हा पिडीत तरुणीला घेवून बाहेर जिल्ह्यात तिच्या घराजवळ भाड्याच्या खोलीत रहायला लागला. पिडीत तरुणीने लग्नाबाबत विचारले असता कागदपत्राचा बहाना करुन भूषण टाळाटाळ करत होता. त्यानंतर एकेदिवशी अचानक भूषण हा काही न सांगता रात्री घरातूनन निघुन गेला.
शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी
पिडीत तरुणी संशयित आरोपी भूषणला भेटायला आल्यावर त्याची आई, वडिल संजयराव तायडे, भाऊ गौतम तायडे यांनी पीडीतेला शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिली. दरम्यान, यानंतर पिडीत तरुणीने आपल्या जवळच्या पोलीस ठाण्यात गुन्हा केला. त्यानंतर तपासकामी तो गुन्हा मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा वर्ग करण्यात आला आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात भाग ०५ गुरंन ४९/२०२२ भादवि कलाम २०२२ भादवि कलम ३७३ (२) (n), ५०४,५०६ नुसार भूषण संजयराव तायडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल बोरकर करीत आहेत.