जळगाव (प्रतिनिधी) पर्यावरण दिनाचे औचित्य साधून जळगावच्या सुकृती ड्रीम होममधील रहिवाशांकडून नुकतेच वृक्षारोपण करण्यात आले. फक्त वृक्षारोपण नव्हे तर, या वृक्षांचे संगोपन करण्याचा निर्धार देखील सुकृती ड्रीम होममधील रहिवाशांनी व्यक्त केला आहे.
सुकृती ड्रीम होममधील सदनिका धारकांनी वाटीका आश्रम जवळ, आहुजा नगरच्या समोर, जळगाव या 192 फ्लॅट असलेल्या संकुलाच्या आवारात 5 जून रोजी पर्यावरण दिनाचे औचित्य साधून माहे जुने ते जुलै 2022 अखेर जास्तीत जास्त वुक्षारोपण करण्याचा निर्णय घेतलेला होता. त्यानुसार साधारण 50 वृक्ष सदनिकाधारकांनी लावून त्याला ट्री गार्ड लावून त्यांचे संगोपन केले करण्याचा निर्धार केला आहे. तसेच स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट 2022 च्या अनुषंगाने पूर्व तयारी कामी सुकृती ड्रीम होममधील सदनिका धारकांनी स्वच्छता अभियान देखील राबविले. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवसाजरा करणेबाबत हर घर तिरंगा अभियान सुद्धा राबविणेबाबत सुकृती ड्रीम होम फ्लॅट ओनर्स असो. मार्फत तयारी सुरु आहे. यावेळी सोसायटीचे अध्यक्ष अरविंद देशमुख, सचिव भारत भगत, नानाभाऊ पाटील, सदस्य गणेश चौधरी, तसेच सदनिकाधारक चेतनसिंग गिरासे, संदिप थोरात, विवेक पुणेवार, विक्रांत पाटील, सतिष पाटील, किरण अत्तरदे, योगेश नाईक, डॉ. कमलेश बयस, डॉ. पी. जी. पळसीकर आदि उपस्थित होते.