अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेरचे आमदार अनिल पाटील यांचे वडील नानासाहेब भाईदास संतोष पाटील यांचे आज वृध्दपकाळाने निधन झाले.
अमळनेर तालुक्यातील हिंगोणे बु.येथील रहिवासी तथा सा.बां. विभागाचे निवृत्त अभियंता तसेच अमळनेर मतदार संघाचे आमदार अनिल पाटील यांचे वडील नानासो भाईदास संतोष पाटील यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी आज दि. १७ एप्रिल २०२१ रोजी सकाळी ९ वाजता अमळनेर येथील राहत्या घरी वृध्दपकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्यावर अमळनेर येथेच आज दुपारी ३ वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत,
आजपर्यंत आमचे सर्व नातलग, हितचिंतक आणि तमाम नागरिक आमच्या सर्व सुख दुःखात सहभागी होत आले आहेत, परंतु आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती वेगळी असल्याने प्रत्येकाने स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे. यासाठी कुणीही अंतयात्रेत सहभागी होऊ नये, अथवा सांत्वनासाठी घरी भेटीसाठी येऊ नये, असे आवाहन अमळनेर विधानसभेचे आमदार अनिल पाटील, जि.प.सदस्या जयश्री पाटील यांनी केले आहे.