साकळी ता. यावल ( प्रतिनिधी) आज यावल तालुक्यातील साकळी येथे ४ वाजेच्या सुमारास ट्रक व दुचाकीची जोरदार धडक झाल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून ट्रक चालक फरार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी ४ वाजेच्या सुमारास गावातील विद्युत केंद्र साकळी जवळ दुचाकीस्वार हा किनगावकडून येत असताना ट्रक हा गावातून येताना विद्युत केंद्राजवळ दोघांची जोरदार धडक झाली. यात किनगाव येथील रहीम शाह असे जखमी झालेल्याचे नाव असून त्यास यावल येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या दरम्यान ट्रक चालक हा फरार झाला असून ट्रकमध्ये पपईन भरलेला होता. यावेळी अपघात झाला त्यावेळी कोणीही नसल्याचे पाहून ट्रक चालकाने पळ ठोकला असून अपघात स्थळी गर्दी जमली होती. तसेच रुग्णवाहिका एक तास उशिरा पोहचल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला.
साकळीतील रस्त्यांवर असलेल्या खड्ड्यांमुळे झाला अपघात
साकळी ते साकळी बस स्टॅन्ड रोड हा पूर्णपणे खड्ड्यांनी भरलेला आहे. या खड्ड्यांमुळे अपघाताला आमंत्रण मिळाले असून त्वरित याकडे सा.बा. विभागाने लक्ष द्यावे अशी मागणी गावकरी करत आहेत. रस्त्यांवरील खड्डे तात्काळ बुजण्यात यावे अशी ही मागणी नागरिक करीत आहे.