चोपडा (प्रतिनिधी) अवकाळी पाऊस व जोरदार वादळामुळे चोपडा तालुक्यातील येथे केळी बागांचे मोठे नुकासान होऊन शेतकऱ्यांचे आर्थिकदृष्ट्या कंबरडे मोडले गेले आहे. सदर चोपडा तालुक्यातील गावांमध्ये नुकसानग्रस्त शेती शिवाराची खासदार रक्षाताई खडसे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन सांत्वन केले. तसेच शासनाकडे पाठपुरावा करून, लवकरात लवकर मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याबाबत आश्वासन दिले.
तालुक्यातील अधिकाऱ्यांची घेतली आढावा बैठक
तसेच महसूल विभाग, कृषी विभाग, महावितरण विभाग व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची तसेच तहसीलदार, गट विकास अधिकारी, कृषी अधिकारी, वैद्यकीय अधिकारी ई.ची खासदार रक्षाताई खडसे यांनी बैठक घेऊन तालुक्यातील कोविड व वादळाने झालेल्या नुकसानीचा आढावा घेऊन संबंधितांना तत्काळ नुकसानीचे पंचनामे विमा कंपनीस सादर करणे, नुकसानग्रस्त विद्युत उपकरणाची दुरुस्ती करून शेतीसाठी विद्युत पुरवठा सुरळीत करणे कार्यवाही करणे बाबत सूचना केल्या.
कोरोना योद्ध्यांचे सत्कार
भाजपा चोपडा तालुक्याच्यावतीने कोरोना महामारीच्या काळात आपापल्या परीने अन्यदान करून, आरोग्य विषयक साहित्य वाटप करून तसेच रुग्ण सेवा केलेल्या कोरोना योध्यांचा खासदार रक्षाताई खडसेंच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
ओबीसीचे राजकीय आरक्षण संपवणाऱ्या राज्य सरकारचा निषेध
तसेच महाविकास आघाडी सरकारने ओबीसी आरक्षणा विषयी दाखल केलेली पुनर्विचार याचिकाही सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे राज्यातील ग्रामपंचायत, जिल्हापरिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना मिळणारं अतिरिक्त राजकीय आरक्षण आता संपुष्टात आलं आहे. त्याबद्दल राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे झालेल्या ओबीसिंच्या नुकसानाबाबत भाजपा चोपडाच्या वतीने राज्य सरकारचा निषेध करून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
उपस्थित पदाधिकारी व अधिकारी
यावेळी तालुकाध्यक्ष पंकज पाटील, शहर अध्यक्ष गजेंद्र जैस्वाल, जि.प.सदस्य गजेंद्र सोनवणे, माजी सभापती आत्माराम म्हाळके, प.स.सभापती प्रतिभा पाटील, युवामोर्चा अध्यक्ष प्रकाश लक्ष्मन पाटील, तालुका सरचिटणीस हनुमंतराव महाजन, भरत सोनगिरे, विकासो चेअरमन विठ्ठल वाघ, चंद्रशेखर पाटील, चंद्रशेखर ठाकूर, राकेश शांताराम पाटील, अमोल खंडेराव पाटील, भाजपा ओबीसी सेल तालुकाध्यक्ष सुरेश शिवाजीराव चौधरी, भाजयुमो तालुकाध्यक्ष तुषार दिनेश पाठक, सौ. अनिता नेवे, शहर उपाध्यक्ष प्रविण चौधरी, मनोहर बडगृजर, रंजना नेवे, डॉ. भारती क्षीरसागर, राजेंद्र गोपीचंद डाभे, विजय बळीराम बाविस्कर, भूषण हनुमान महाजन, निलेश रमेश पाटील, सरचिटणीस सुमित चौधरी यांच्यासह महावितरण उपकार्यकारी अभियंता एन एस रासकर, एक के बढे, वैद्यकीय अधिकारी उपजिल्हा रुग्णालय चोपडा डॉ.मनोज पाटील, पशुधन विस्तार अधिकारी चोपडा डॉ.प्रिया बागडे, मुख्याधिकारी चोपडा अविनाश गांगोडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप पी. लासूरकर, कृषी अधिकारी आर. आर. चौधरी, प्र.तालुका कृषी अधिकारी प्रशांत विठ्ठल देसाई, मंडळ कृषी अधिकारी अडावद मनोहर पाटील इ. उपस्थित होते.















