चोपडा (प्रतिनिधी) माजी विद्यार्थी स्नेहमेळावा, प्रताप विद्या मंदिर चोपडा १९९७-९८ तुकडी क बैचच्या विध्यार्थ्यांचा स्नेहमिलन सोहळा मुख्याध्यापक आणि माजी वर्ग शिक्षक यांच्या उपस्थितीत प्रताप विद्या मंदिर चोपडा येथे नुकताच पार पडला.
कार्यक्रमाचे सत्कारर्मूर्ती मुख्याध्यापक आर.आर.शिंदे सरांचे स्वागत माजी विद्यार्थीतर्फे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. यावेळी माजी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांच्या जीवनातील विविध पैलूंना उजाळा दिला अनेक शिक्षक भावुक झालेले दिसून आलेत. विद्यार्थ्यांनीही शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करत जुन्या आठवणींना उजाळा दिला. स्नेहमेळावा सोहळ्याचे अध्यक्षस्थान मुख्याध्यापक आर.आर.शिंदे, यांनी भूषविले प्रमुख पाहुणे म्हणून. माजी शिक्षक डॉ.सुधीर चौधरी, माजी शिक्षक एस. बी कुलकर्णी व माधुरी पाटील उपस्थित होते. प्रस्तावना आणि सूत्रसंचालन बाबुलाल पाटील यांनी केले आभार प्रदर्शन भगवान बडगुजर यांनी केले.
कार्यक्रमासाठी नरेंद्र पाटील, राजेंद्र पाटील, नितीन सैंदाणे,प्रवीण पवार, धनराज पगारे, अविनाश पाटील, शिवदास सपकाळे, विकास महाजन, प्रवीण शर्मा, संदीप सूर्यवंशी, विशाल शिंपी, रवींद्र धोबी, मुकेश चौधरी, दीपक पाटील, मच्छिंद्र पाटील, रावसाहेब पाटील, अभिजीत पाटील, गुलाब चौधरी, अमित लेंघे, तुषार पालीवाल, योगेश बडगुजर, महेंद्र देशमुख, योगेश महाजन, सुकलाल पारधी, योगेश पाटील, कैलास महाजन, बाळासाहेब पाटील, राहुल पाटील ई. माजी विद्यार्थी उपस्थित होते.
















