जळगाव (प्रतिनिधी) शहारातील एका ठिकाणी राहणाऱ्या ३६ वर्षीय महिलेचा विनयभंग झाल्याची घटना घडलीय. याप्रकरणी शनिपेठ पोलीस स्थानकात दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे.
यासंदर्भात २६ वर्षीय पिडितेन दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. २५ एप्रिल २०२२ रोजी पिडीत महीला तिच्या जुन्या घर मालक गोपाळ सिताराम पाटील यांच्यासोबत मोबाईलवर बोलत होती. यावेळी पवन विनोद गोसावी हा वाईट साईट बोलला. याचा जाब विचारण्यासाठी पिडीत महिला व साक्षीदार गोपाळ तायडे हे गेले असता पवन हा घरात जाऊन कोयता घेवून आणला आणि महीलेला पाहुन एक एकला कापतो, असे बोलू लागला. त्याची पत्नी रुतुजा गोसावी हिने कोयता हातातून हिसकावून घेतला. तेव्हा पवन गोसावी याने त्याचा भाऊ आकाश गोसावी याला मोबाईलवर कॉल करुन बोलावून घेतले. आकाश गोसावी व त्याच्या सोबत ४ इसम (नाव पत्ता माहीत नाही) असे आले व त्यांनी महिला तसेच साक्षीदार गोपाळ तायडे अशांना शिवीगाळ करुन मारहाण केली. एवढेच नव्हे तर पिडीत महिलेच्या मनास लज्जा निर्माण होईल असे कृत्य केले. याप्रकरणी शनिपेठ पोलीस स्थानकात पवन गोसावी,आकाश गोसावी या दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच पुढील तपास पो.हे.कॉ रविंद्र दशरथ बोदवडे हे करीत आहेत.