भुसावळ (प्रतिनिधी) भुसावळात गावठी पिस्टल, दोन काडतूंसासह दोघांना अटक करण्यात आली आहे. पोलिस उपअधीक्षकांच्या पथकाने गोपनीय माहितीवरून खरेदीदासह पुरवठादार, अशा दोघांना ताब्यात घेतले आहे.
गावठी पिस्टलाच्या धाकावर संशयित गुन्हा करण्याच्या उद्देशाने शहरातील पु.ओ.नाहाटा चौफुलीवर आल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांना मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला कारवाईचे निर्देश दिले होते. पथकाने नाहाटा चौफुलीवरून प्रकाश सुभाष धुंदे (नाडगाव, ता.बोदवड) यास अटक केल्यानंतर त्याच्याकडून गावठी पिस्टल व दोन जिवंत काडतूस जप्त केले. संशयिताने गावठी पिस्टल भुसावळ शहरातील तौसीफ असलम तडवी (अयान कॉलनी, मुन्ना तेली स्कूलजवळ, भुसावळ) याच्याकडून खरेदी केल्याची कबुली दिल्यानंतर त्याच्याही मुसक्या आवळण्यात आल्या. ही कारवाई शनिवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास करण्यात आली.
पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांना गावठी कट्टा बाळगलेला संशयित नाहाटा चौफुलीवर गुन्हा करण्याच्या उद्देशाने आल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी कारवाईच्या सूचना दिल्या. पोलिस हवालदाज सुरज पाटील व नाईक संकेत अरुण झांबरे यांनी संशयित प्रकाश सुभाष धुंदे (नाडगाव, ता.बोदवड) यास नाहाटा चौफुलीवर अटक केल्यानंतर त्याच्याकडून 25 हजार रुपये गावठी पिस्टल, दोन हजार रुपये किंमतीचे दोन जिवंत काडतूस, 35 हजार रुपये किंमतीची दुचाकी व 10 हजार 500 रुपये किंमतीचे दोन मोबाईल फोन मिळून 72 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.