भुसावळ (प्रतिनिधी) भुसावळ शहरातील श्रीराम नगर हनुमान मंदिराजवळ काही रेकॉड वरील संघटित गुन्हेगारी टोळीची दहशत कायम ठेवण्याच्या उद्देशाने गावठी कट्टा सोबत बाळगणारे चार आरोपीविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखा व बाजारपेठ पोलिस स्टेशनची संयुक्त कारवाई करीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात अधिक असे की, फिर्यादी पोना. रणजित अशोक जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, दिनांक १२ जून २०२२ स्थानिक गुन्हे शाखा जळगाव पोलीस निरीक्षक किरण बकाले यांना गुप्त बातमी मिळल्यावरून किशोर राठोड, किरण धनगर, प्रमोद लाडवंजारी, विनोद पाटील, मुरलीधर बारी तसेच सपोनी हरिष भोये, पोहेकॉ विजय नेरकर, पोना निलेश चौधरी, पोकॉ प्रशांत परदेशी, प्रशांत सोनार, सचिन पोळ, जीवन कापडे अशांना बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या दालनात बोलावून माहिती दिली की, भुसावळ शहरात श्रीराम नगर हनुमान मंदिराजवळ याठिकाणी रात्री 01.45 वाजता अक्षय प्रताप न्हावकर उर्फे थापा वय 24 वर्षे व रितिक नरेश चौधरी वय 23 वर्षे तसेच रेकॉड वरील गुन्हेगार नामे निखिल राजपूत व निलेश ठाकूर यांचे ताब्यात अवैधरित्या एक गावठी पिस्तूल व जिवंत काडतुस मिळून आले. सदरची गावठी पिस्टल व जिवंत काडतुस हे त्यांनी त्यांच्या संघटित गुन्हेगारी टोळीची दहशत कायम ठेवण्याच्या उद्देशाने दिले आहेत म्हणून बाजारपेठ पोलीस स्टेशनला चौघांविरुद्ध आर्म अॅक्ट कलम 3/25,5 / 25 प्रमाणे उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ ठाण्याचे निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या आदेशावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय प्रताप न्हावकर उर्फे थापा व रितिक नरेश चौधरी दोघांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे तर निखिल राजपूत व निलेश ठाकूर हे दोघे आरोपी फरार आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सपोनी हरिष भोये व पोकॉ योगेश महाजन करीत आहे.
शहरातील श्रीराम नगर हनुमान मंदिराजवळ संघटित गुन्हेगारी टोळीची दहशत कायम ठेवण्याच्या उद्देशाने गावठी पिस्टल बाळगणारे अक्षय प्रताप न्हावकर उर्फे थापा व रितिक नरेश चौधरी न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सूनविण्यात आली आहे. तर फरार आरोपी निखिल राजपूत व निलेश ठाकूर यांचा कसून शोध सुरू आहे.