जळगाव (प्रतिनिधी) ग्राहक असल्याची बतावणी करत मोटासायकल टेस्ट करण्यासाठी राईड घेतो असे सांगून मोटारसायकल घेवून पसार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. फसवणूक केल्याप्रकरणी रामानंदनगर पोलीस स्थानकात कुणाल रजपुतसह एका अज्ञात इसमाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात अक्षय रमेश मोर (वय २०, रा. विवेकानंद नगर जळगाव) याने दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. १७ मे २०२२ रोजी कुणाल रजपुतसह एका अज्ञात इसम यांनी ग्राहक असल्याची बतावणी करून अक्षयाच्या भावाच्या मालकीची ४० हजार रुपये किंमतीची केटीएम, RC १२५ कंपनीची ऑरेंज ब्लॅक रंग असलेली मोटारसायकल नंबर MH १९ DL ४५९८ ही टेस्ट राईट घेतो असे सांगून फसवणूक करून घेऊन गेला आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस स्थानकात कुणाल रजपुतसह एका अज्ञात इसमाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पुढील तपास पोना सुनील पाटील हे करीत आहेत.