जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील उमाळा बसस्थानकासमोरून दुचाकीसह दोन चोरट्यांना एमआयडीसी पोलीसांनी कारवाई करत गुरूवारी अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीच्या एकुण ३ दुचाकी जप्त करण्यात आला आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
जामनेर तालुक्यातील गाडेगाव येथील रहिवाशी भूषण झांबरे १९ सप्टेंबर रोजी कामाच्या निमित्ताने (एमएच १९ बीएल ९३३४) या दुचाकीवरून जळगावकडे येत असताना रस्त्यावरील उमाळा बसस्थानकाजवळ नास्ता करण्यासाठी थांबले. त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी अवघ्या २० मिनिटात हे त्यांची दुचाकी चोरून नेली. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान कुसुंबा शिवारातील काही मुलांनी उमाळा गाव परिसरात अजून काही दोन दुचाकी चोरून पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना माहिती मिळाली. या गुन्ह्याच्या शोध घ्यावा, अशा सूचना पोलीस निरीक्षक निकम यांनी दिल्या. त्यानुसार पथकातील पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, पोलीस कॉन्स्टेबल दत्तात्रय बडगुजर, गणेश शिरसाळे, किशोर पाटील, विकास सातदिवे, योगेश बारी, नितीन ठाकूर, नाना तायडे, किरण पाटील, गणेश ठाकरे, ललित नारखेडे यांनी कारवाई करत संशयित आरोपी पवन उर्फ भांजे गणेश पाटील वय-२२ आणि निखिल जयराम पाटील वय-२१ दोन्ही रा. इंदिरानगर, कुसुंबा या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरीच्या एकूण तीन दुचाकी हस्तगत करण्यात आले.