धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातून एकाची मोटारसायकल चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात गोकुळ काशिनाथ गवारे (वय ३४, रा. मु.पो. चितेगाव ता. निफाड जि. नाशिक ह.मु. समर्थनगर धरणगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि.१८ मे २०२२ रोजी कोणीतरी अज्ञात चोरट्याने २५ हजार रुपये किंमतीची एक निळ्या रंगाची फॅशन प्रो मोटारसायकल क्रमांक (MH १५ – CW ५६१६) चोरून नेली. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.ना. प्रमोद पाटील हे करीत आहेत.