धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील चोपडावरील हॉटेल मंथन येथून अज्ञात चोरट्याने दुचाकी लांबविल्या प्रकरणी धरणगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक असे की, प्रदीप कुमार काशिनाथ पवार (वय ४६, रा. पारधी वाडा धरणगाव) हे हॉटेल मंथन येथे ७ फेब्रुवारी २०२२ रोजी रात्री ८.४५ वाजेच्या दरम्यान जेवणासाठी गेले होते. यावेळी हॉटेलच्या बाहेर लावलेली ३० हजार रुपये किंमतीची हिरो-होंडा स्पेलेंडरप्लस कंपनीची मोटार सायकल क्रमांक (एमच-१९ एफ. २४८७) अज्ञात चोरट्याने चोरून नेली. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहा. फौजदार योगेश जोशी हे करीत आहेत.