मुंबई (वृत्तसंस्था) बिहार विधान निवडणुकीच्या आखाड्यात आता शिवसेनाही उतरली आहे. विधानसभेच्या ५० जागांवर सेना आपले उमेदवार देणार आहे, अशी माहिती शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी दिली होती. बिहारमधील प्रादेशिक पक्ष हे शिवसेनेशी हातमिळवणी करण्यासाठी इच्छुक आहेत. त्या पक्षांबाबतही निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले. कॉंग्रेस आणि शिवसेना एकत्र येत निवडणूक लढवू शकते असे संकेतही त्यांनी दिले.
दरम्यान, आता शिवसेनेनं बिहार निवडणुकांसाठी आपल्या प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत यांच्यासह आणखी 20 जणांच्या नावांचा समावेश आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, सुभाष देसाई, संजय राऊत, चंद्रकांत खैरे, अनिल देसाई, विनायक राऊत, अरविंद सावंत, गुलाबराव पाटील, राजकुमार बाफना, प्रियांका चतुर्वेदी, राहुल शेवाळे, कृपाल तुमाने, सुनिल चिटणीस, योगराज शर्मा, कौशलेंद्र शर्मा, विनय शुक्ला, गुलाबचंद दुबे, अखिलेश तिवारी, अशोक तिवारी यांच्या नावांचा स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश आहे.
अनिल देसाई म्हणाले होते कि, “सुशांतसिंह राजपूत प्रकरणात खोटा प्रचार करण्यात आला. खोटी माहिती पसरविण्यात आली. महाराष्ट्राला बदनाम करण्याचे कारस्थान भाजपने केले आहे, पण आता सत्य समोर आले आहे. तसेच देवेंद्र फडणवीस हे भाजपकडून निवडणुकीचे नियोजन करत असून त्यांनी महाराष्ट्राची बदनामी करू नये, असं ते म्हणाले होते.