जळगाव (प्रतिनिधी) निलंबित पोलिस निरिक्षक किरण बकालेंना तात्काळ अटक न केल्यास दि.१० ऑक्टोबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्व जाती धर्मीय संघटना बेमुदत साखळी उपोषण करण्याचा इशारा आज देण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन आज जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षकांना देण्यात आले. दुसरीकडे बकालेंनी अटकपूर्व जामीनसाठी आता उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे निलंबित पोलिस निरिक्षक बकाले यास जाणुनबुजून अटक केली जात नसल्याचा आरोप करून सर्व जातीधर्म, विविध संघटनानांचे पदाधिकारी हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दि.१० ऑक्टोबरपासून बेमुदत साखळी उपोषणास बसणार आहेत. निवेदन देतेवेळी यामध्ये आ.भा. छावा मराठा युवा संघटना,मराठा सेवा संघ, मराठा प्रिमियर लिग, लोक संघर्ष मोर्चा, मराठा उद्योजक विकास मंडळ, संभाजी ब्रिगेड सामाजिक, जिजाऊ ब्रिगेड, ग स सोसायटी अध्यक्ष व संचालक मंडळ परिवार, बुलुंद छावा संघटना,आखिल भारतिय युवा संघटना, मराठा क्रांती मोर्चा ,संभाजी सेना,संभाजी ब्रिगेड राजकिय,नारीशक्ती बहुऊद्देशिय संस्था,कंजरभाट समाज मंडळ,नवयुवक मराठा मंडळ, छत्रपती शिवाजी राजे बहुऊद्देशिय संस्था ,आ भा लेवा महासंघ ,धनगर समाज महासंघ ,संतुजी ब्रिगेड हिन्दु खाटीक समाज,समता विकास परिषद,जनक्रांती मोर्चा ,मणियार बिरादरी,खान्देश माळी महासंघ ,मौलाना आझाद विचारमंच,आ भा मराठा महामंडळ ,बामसेफ ,छावा मराठा युवा महासंघ ,जेष्ठ नागरिक महासंघ ,कादरी मल्टिपर्पज फाऊंडेशन,आधार जेष्ठ नागरिक संघ इ.सर्व जातीधर्माचे संघटना या उपोषणात सक्रीय सहभाग घेणार आहेत.
बकालेंची उच्च न्यायालयात धाव
निलंबित पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांचा जळगाव जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर त्यांनी आता अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली आहे. न्यायालयाने तपासाधिकाऱ्यांचे म्हणणे मागविले आहे. अर्ज दाखल केला असल्याच्या वृत्तास तपासाधिकारी अरुण धनवडे यांनी दुजोरा दिला.
बकाले देताय गुंगारा, महाराष्ट्रा बाहेर गेल्याचीही चर्चा !
किरणकुमार बकाले यांच्या अटकेसाठी ठाणे येथे गेलेले तिसरे पथकही सोमवारी रिकाम्या हातानेच परतले होते. बकाले यांना पोलीस कशा पद्धतीने एखादं आरोपीचा माग काढतात, हे चांगल्या प्रकारे माहित असल्यामुळेच ते आपल्याच पोलीस दलाला गुंगारा देण्यात यशस्वी ठरत आहेत. बकाले यांना निलंबित कालावधीत नाशिक ग्रामीण येथे हजेरी देण्याची आदेश दिले होते व त्यांचे लोकेशन नाशिक येथे आढळून आल्याने येथे एक पथक पाठविण्यात आले होते. तसेच ठाण्यात त्यांचे घर असून दुसरे पथक गेल्या पंधरवड्यात तेथे जावून आले. या दोन्ही पथकांना तसेच नुकत्याच परतलेल्या पथकाला देखील बकाले मिळून आले नाहीत.