धरणगाव (प्रतिनिधी) श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित धरणगाव केंद्राच्या वतीने परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या आशीर्वाद व मार्गदर्शनाने दि. 11 सप्टेंबर 2023 सोमवार रोजी दुपारी 3.30 वाजता शिवलिंगार्चन सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.
जागृत देवस्थान श्री सार्जेश्वर महादेव मंदिर पारोळा नाक्याजवळील येथे पाऊस भरपुर पडण्यासाठी पर्जन्यसुक्तासह सोडोपचारसह रुद्र अभिषेक सेवा होणार आहे. रूद्र अभिषेक सेवेचे महत्व नेहमी गुरूमाऊली मार्गदर्शनात सांगतात की, असाध्य आजार, व्यसन मुक्ती हट्टी तापट स्वभावाचे लोक यांना जर हे तीर्थ सतत महादेवाचा पिंडीवर रूद्र अभिषेक सेवा 40 दिवस केली व हे तीर्थ दिले तर सर्व समस्या सुटत असतात.
सेवेसाठी आणायचे पुजेचे साहित्य.नित्यसेवा ग्रंथ पाठ पाटावर पांढरे कोरे कापड महादेवाची पिंड ताम्हण स्टॅन्ड गळती फुलपात्र पाण्याच्या दोन बाटल्या आसन पंचामृत हळद कुंकू अक्षदा अष्टगंधा बेलपत्र अगरबत्ती दिवा देवपूसण्यासाठी वेगळा रूमाल आणि स्वतःच्या हात पुसण्यासाठी रूमाल इत्यादी साहित्य सोबत आणावे. या सेवेसाठी जास्त जास्तीत जास्त भाविक व सेवेकऱ्यानी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित धरणगाव तालुक्याच्या सेवेकरी परिवाराच्या वतीने करण्यात आलेले आहे.