पाळधी ता. धरणगाव (प्रतिनिधी) येथील कुणाल ट्रेडिंग कंपनीचे गोडाऊन अज्ञात चोरटयांनी फोडत १७ हजार ५०० रुपययाची रोकड, चेकबुक, सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे सेटअप बॉक्स लंपास केल्याची घटना आज उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
यासंदर्भात अधिक असे की, अनिल अशोक कोळी धान्याचे व्यापारी, (वय ४० रा. माळी वाडा पाळधी ता. धरणगाव) यांचे कुणाल ट्रेडिंग कंपनी इथून अज्ञात चोरट्यांनी १७ हजार ५०० रुपये रोकड चेकबुक, सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे सेटअप बॉक्स लांबवले. याप्रकरणी अनिल कोळी यांच्या फिर्यादी वरून पाळधी दूरक्षेत्र पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस सपोनि, गणेश बुवा हे करीत आहे.