भडगाव (प्रतिनिधी) शहरातील शासकीय निवास स्थान क्र ३ मधून अज्ञात व्यक्तीने शौचालय प्रस्तावसह फाईल व मग्रारोहयो योजनेचे शासकीय दप्तर दस्तऐवज मस्टर मागणी व मस्टर, कोरे रजिस्टर, फाईल चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे.
यासंदर्भात अधिक असे की, सन २०११-१२ ते २०२०-२०२१ पर्यंतचे शौचालय प्रस्तावसह फाईल व मग्रारोहयो योजनेचे शासकीय दप्तर दस्तऐवज मस्टर मागणी व मस्टर, कोरे रजीस्टरा, फाईल या अज्ञात व्यक्तीने निवासस्थानाचे मागील दरवाजा तोडुन अनाधिकारे प्रवेश करुन संमती शिवाय व लबाडीच्या इराद्याने चोरुन नेले. याप्रकरणी पंचायत समितीचे सहा. अधिकारी रवींद्र दशरथ जगताप (वय ५३) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भडगाव पोलीस ठाण्यात गुरंन ३९/२०२१ भादवि कलम ५५४, ५५७, ३८० प्रमाणे अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेका विलास बाबुराव पाटील करीत आहेत.