TheClearNews.Com
Saturday, May 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

माणुसकीचे अनोखे दर्शन : मुस्लीम तरुणांकडून कोरोना मृत रुग्णाच्या अंत्यसंस्कारासाठी पुढाकार

The Clear News Desk by The Clear News Desk
March 17, 2021
in फैजपूर
0
Share on FacebookShare on Twitter

फैजपूर (प्रतिनिधी) मयत झालेल्या हिंदू कोरोना रुग्णाचे लांबवर असलेले नातेवाईक वेळेवर पोहचू शकत नसल्याने फैजपूर शहरातील मुस्लिम तरुणांनी मयत व्यक्तीचे पार्थिव न्हावी ग्रामीण रुग्णालयातुन हलविण्यापासुन तर स्मशानभूमीत पोहचवत अंत्यविधीसाठी सहकार्य करून माणुसकीचे एक अनोखे दर्शन घडविले. यावेळी रुग्णालयात केवळ मयताची पत्नी, शालक उपस्थित होता.

भालोद, ता. यावल येथील एक ६० वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली होती. त्याला अत्यवस्थ स्थितीत बुधवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास न्हावी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता त्यांची डॉक्टर अभिजित सरोदे यांनी तपासणी केली असता तो मृत झाला होता. त्यामुळे डॉ. सरोदे यांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान, मृत व्यक्ती सोबत यावेळी केवळ त्याची पत्नी उपस्थित होती. तर अन्य नातेवाईक हे दूर वर राहत असल्याने ते अंत्यसंस्कारसाठी पोहचू शकत नव्हते. त्यामुळे अंत्यविधीचे सोपस्कार रूग्णालय मार्फत करावे अथवा अन्य पद्धतीने करावे असा पेच निर्माण झाला होता. फैजपूरचे नगरसेवक शेख कुर्बान शेख करीम यांना ही माहिती मिळाली. त्यांनी तातडीने त्यांच्या सोबत चार मुस्लिम तरुण व पालिकेचे सफाई कामगार अशा सर्वाना सोबत घेऊन न्हावी ग्रामिण रुग्णालयात धाव घेतली. यात मुस्लिम तरुण अशपाक कुरेशी, जुबेर बेग, शरीफ खान, उमर खान, पालिका कर्मचारी मयूर चिरावंडे, अनिल अटवाल सर्वांनी पीपीइ किट परिधान करीत मयत व्यक्तीला न्हावी ग्रामीण रुग्णालयातुन स्मशान भूमी न्हावी पर्यंत नेण्यासाठी सहकार्य केले. त्यानंतर अंत्यविधीसाठी हातभार लावला. यावेळी मयताचे शालक यांनी अग्निडाग दिला. यावेळी फैजपूरचे नगरसेवक देवेंद्र बेंडाळे, नगरसेवक केतन किरंगे, न्हावीचे पोलीस पाटील संजय चौधरी, संजय वाघूळदे यांचीही उपस्थित होती. यावेळी हिंदू व्यक्तीच्या अंत्यसंस्कारला मुस्लिम तरुणांनी केलेले सहकार्य माणुसकीचे दर्शन घडविणारे ठरले.

READ ALSO

फैजपूरमध्ये चोरट्यांचा गॅस गोदामावर डल्ला १०० भरलेले सिलिंडर लंपास

स्वामीनारायण मंदिराचे कोठारी शास्त्री भक्तीकिशोरदासजी यांचे हृदयविकाराने निधन !

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

फैजपूरमध्ये चोरट्यांचा गॅस गोदामावर डल्ला १०० भरलेले सिलिंडर लंपास

April 26, 2026
फैजपूर

स्वामीनारायण मंदिराचे कोठारी शास्त्री भक्तीकिशोरदासजी यांचे हृदयविकाराने निधन !

June 29, 2024
गुन्हे

सावदा येथे डोक्यात दगड घालून सालदाराचा निर्घृण खून : चार तासात संशयित अटकेत !

March 30, 2024
गुन्हे

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार, तीन वेळेस गर्भपात ; फैजपूर पोलिसात तरुणाविरुद्ध गुन्हा !

July 2, 2023
गुन्हे

लग्नाचे आमिष दाखवून विवाहितेवर अत्याचार, गर्भपात करण्यासही पाडले भाग ; फैजपूर पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा !

July 2, 2023
फैजपूर

‘सुज्ञा’ने दहावी परीक्षेत मिळविले घवघवीत यश !

June 2, 2023
Next Post

गुडघ्यावर फाटलेल्या जीन्स घालणाऱ्या महिला त्यांच्या मुलांना काय संस्कार देणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मुंबईतील महिलेवर अत्याचार, आध्यात्मिक बाबाला बेड्या !

October 2, 2021

जाणून घ्या…कोणत्या मुद्द्यांच्या आधारे निवडणूक आयोगाने शिंदे गटाला दिली संपूर्ण ‘शिवसेना’ !

February 17, 2023

जळगाव येथे ‘ब्लड फॉर महाराष्ट्र’ या अभियानअंतर्गत रक्तदान शिबिर

April 16, 2021

तरुणांनो व्यसनापासून दूर रहा ; विवरे येथील कार्यक्रमात गुलाबराव देवकर यांचे प्रतिपादन !

March 5, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group