बोदवड (प्रतिनिधी) बोदवड तालुक्यात चार ग्रामपंचायतीच्या सरपंचांची आज निवड करण्यात आली असून या सर्व निवडी बिनविरोध झाल्या आहेत. त्यात लोणवडी येथे सरपंचपदी शिलाबाई सुरेश पाटील तर उपसरपंचपदी पंकज गजानन चौधरी यांची निवड झाली.
यावेळी पंचायत समिती विस्तार अधिकारी खेमचंद वानखेडे यांनी कामकाज पहिले. सुरवाडा बुद्रुक येथे शशिकांत साहेबराव कोळी यांची सरपंचपदी तर उपसरपंचपदी मनोहर प्रल्हाद सुरवाडे यांची निवड झाली. यावेळी वरिष्ठ सहाय्यक पंचायत समितीचे संजय पाटील यांनी अध्यासी अधिकारी म्हणून कामकाज पाहिले. राजूर येथे प्रमोद गोविंदा शेळके यांची सरपंचपदी तर चंदन कौतिक पाटील यांची उपसरपंचपदी निवड झाली. निवडप्रक्रियेसाठी कृषिपर्यवेक्षक बी एन चौधरी यांनी कामकाज पाहिले. अमदगावला सरपंचपदी संभाजी गंगाराम पारधी तर उपसरपंचपदी सीमा मिलींद गुरचळ यांची निवड झाली. यावेळी पंचायत समितीचे स्थापत्य अभियंता सहाय्यक विलास वाघ यांनी कामकाज पाहिले.














