रावेर (प्रतिनिधी) काल बऱ्हाणपूर – अंकलेश्वर महामार्गाला लागून एका प्लॉटिंग टाकलेल्या ठिकाणी रावेर शहरानजिक एका ३५ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्युदेह आढळून आला होता. कालच पोलिसांनी घटनास्थळी चौकशी सुरू केली होती. दरम्यान, रावेर पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात या खूनाचा उलगडा केला असून पोलिसांनी या प्रकरणी चौघांना अटक केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, काल ३ फेब्रुवारी रोजी बहाणपूर -अंकलेश्वर महामार्गाला लागून एका प्लॉटिंग टाकलेल्या ठिकाणी रावेर शहरानजिक एका ३५ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्युदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. कालच घटनास्थळी पोलिस निरिक्षक एस. टी. पाटील, सहाय्यक पोलिस निरिक्षक शितलकुमार नाईक, पोलिस उपनिरिक्षक मनोज वाघमारे, मनोहर जाधव यांनी चौकशी सुरू केली होती. दरम्यान, रावेर पोलिसांनी चोवीस तासातच या खूनाचा उलगडा केला आहे. याप्रकरणी चार आरोपीची ओळख पटली असून चारही जेरबंद करण्यात आले असल्याची माहीती पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी दिली. महेश विश्वनाथ महाजन, विकास गोपाल महाजन, विनोद विठ्ठल सातव, भैय्या दुबी (पुर्ण नाव माहित नाही) सर्व रा. रावेर ही आरोपींची नावे असल्याची माहिती डॉ. प्रवीण मुंढे यांनी दिली.