TheClearNews.Com
Friday, August 1, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

संसदेत नीट पेपरफुटीवरून गदारोळ ; घोषणाबाजीसह विरोधकांचा सभात्याग !

vijay waghmare by vijay waghmare
June 29, 2024
in राष्ट्रीय, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) ‘राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा-स्नातक’ अर्थात ‘नीट-यूजी’ परीक्षेचा पेपर फुटणे व परीक्षेतील अनियमितेच्या मुद्द्यावरून संसदेत शुक्रवारी विरोधकांनी अभूतपूर्व गोंधळ घातला. या मुद्द्यावर तत्काळ चर्चा करण्याची मागणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षांनी एकमुखाने केली. याप्रश्नी त्यांनी अध्यक्षांच्या आसनासमोरील हौद्यात येऊन घोषणाबाजीसह मोठा गोंधळ घातला. तर राज्यसभेचे सभापती आम्हाला सापत्न वागणूक देत असल्याचा आरोप करीत विरोधकांनी सभात्याग केला.

लोकसभेचे कामकाज सुरू होताच अध्यक्ष ओम बिर्ला यांनी १३ माजी खासदारांच्या निधनाची माहिती सभागृहाला दिली. काही मिनिटांचे मौन बाळगत दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी ‘नीट-यूजी’ पेपरफुटीचा मुद्दा उचलून धरला व तत्काळ चर्चेची मागणी केली. पण राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर चर्चा करताना विरोधकांनी स्वतःचे म्हणणे सविस्तरपणे मांडावे. आम्ही सध्या स्थगन प्रस्तावाची नोटीस विचारात घेऊ शकत नाही, असे अध्यक्षांनी सांगितले. त्यावर समाधान झाले नसल्याने काँग्रेसचे नेते राहुल गांधी म्हणाले की, आम्ही देशातील विद्यार्थ्यांना सरकार व विरोधकांकडून संयुक्त संदेश देऊ इच्छितो. विद्यार्थ्यांचे प्रश्न आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. म्हणूनच नीट प्रश्नी चर्चा करण्याची राज्यसभेत विरोधकांचा सभात्याग आमची इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले.

READ ALSO

शानबाग विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घेतला ‘गाईड’ एकांकिकेचा भावस्पर्शी अनुभव

मनाची सुंदरता महत्त्वाची – स्मिता पाटील-वळसंगकर

अखिलेश यादव व इतर नेत्यांनी राहुल यांच्या सुरात सूर मिसळला. परंतु, ओम बिर्ला यांनी चर्चेला परवानगी दिली नाही. यावेळी विरोधकांचा गदारोळ सुरूच होता. त्यामुळे पहिल्यांदा कामकाज १२ वाजेपर्यंत स्थगित झाले. त्यानंतरही गोंधळ कायम राहिल्याने लोकसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. दुसरीकडे, राज्यसभेतही ‘नीट-यूजी’चा मुद्दा चांगलाच गाजला. विरोधकांनी नियम २६७ नुसार, चर्चेसाठी २२ नोटीस दिल्या. ‘नीट-यूजी’तील अनियमितता, राष्ट्रीय परीक्षा एजन्सीचे (एनटीए) अपयश व पेपर लिक संबंधित मुद्द्यावर चर्चा करण्याची मागणी केली. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी केली.

राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, गेल्या ७ वर्षांत ७० वेळा पेपर लिक झाल्याने विद्यार्थी त्रस्त आहेत. त्यामुळे या मुद्द्यावर चर्चा करण्याची गरज आहे. परंतु सभापती जगदीप धनखड यांनी चर्चेची मागणी फेटाळली. त्यामुळे विरोधकांनी मोठा गोंधळ घातला. पहिल्यांदा १२ व त्यानंतर दुपारपर्यंत कामकाज स्थगित झाले. वरिष्ठ नेत्यांनी राज्यसभेत गदारोळ घालण्यावर सभापतींनी नाराजी व्यक्त केली. याचदरम्यान सभापती विरोधकांना सापत्न वागणूक देत आहेत. मला अपमानित करण्यासाठी दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप खरगे यांनी केला. त्यानंतर सर्व विरोधकांनी सभात्याग केला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Uproar in the Parliament due to neat paperwork; The opposition boycotted the meeting with slogans!

Related Posts

जळगाव

शानबाग विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घेतला ‘गाईड’ एकांकिकेचा भावस्पर्शी अनुभव

July 30, 2025
जळगाव

मनाची सुंदरता महत्त्वाची – स्मिता पाटील-वळसंगकर

July 4, 2025
भुसावळ

भुसावळातील ‘ब्रेकींग महाराष्ट्र’चा ‘वाटा शिक्षणाचा’ उप्रकम विद्यार्थ्यांसाठी पथदर्शी : महेश फालक

June 1, 2025
जळगाव

विद्यार्थ्यांनी शिस्त, सातत्य आणि त्याग तीन गोष्टी कायम अंगिकाराव्या : अतुल जैन

May 18, 2025
जळगाव

जळगाव जिल्ह्यातील 10 वी, 12 वी मध्ये यश मिळालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव

May 16, 2025
जळगाव

अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूलमध्ये आशा वर्करचा मुलगा प्रथम

May 13, 2025
Next Post

भुसावळच्या महिलेची १० लाखांची फसवणूक ; मयत पतीच्या विमा पॉलिसीचे पैसे एजंटने परस्पर लाटले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

LICच्या योजनेत एकदा पैसे गुंतवून मिळेल भरघोस पेन्शन ; जाणून घ्या…संपूर्ण माहिती !

March 5, 2022

Online Kasino Mostbet Získejte Bonus Za Registraci Díky Promo Kódu

November 19, 2022

मस्तच ! अटल पेन्शन योजनेतून पती-पत्नी मिळवू शकता १० हजार ; जाणून घ्या कसे?

January 3, 2022

देशात गेल्या २४ तासांत आढळले २९,६८९ कोरोनाबाधित, ४१५ रुग्णांचा मृत्यू

July 27, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group