जळगाव (प्रतिनिधी) केंद्रीय लाेकसेवा आयाेगाने २०२० मध्ये घेतलेल्या नागरी सेवा परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला असून, यात चोपड्यातील गौरव साळुंखे, जळगाव येथील चार्टर्ड अकाउंटंट अक्षय साबद्रा व भुसावळातील श्रीराज वाणी या जळगाव जिल्ह्यातील तिघांनी बाजी मारली आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून २०२० मध्ये मुख्य परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा जानेवारी महिन्यात निकाल जाहीर झाला. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात मुलाखती घेण्यात आल्या होत्या. ८६० जागांसाठीच्या परीक्षांचा अंतिम निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये जिल्ह्यातील चोपडा येथील गौरव साळुंखे यांनी देशात १८२ रैंक प्राप्त केली आहे. तसेच जळगावातील अक्षय साबद्रा यांनी ४८० रैंक तर भुसावळ येथील श्रीराज मधुकर वाणी यांनी देशातून ४३० रैंक प्राप्त केली आहे.