मुंबई (वृत्तसंस्था) प्रख्यात अभिनेत्री उर्मिला मातोंडकर या पुन्हा एकदा सक्रिय राजकारणात उतरण्याची शक्यता आहे. उर्मिला या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. सोमवारी मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अभिनेत्री उर्मिला मातोंडकर राजकारणातली आपली दुसरी इनिंग खेळण्याच्या तयारीत आहेत. उल्लेखनिय म्हणजे शिवसेनेने राज्यपाल नियुक्त आमदारांसाठीच्या यादीत उर्मिला यांचं नाव राज्यपालांकडे दिलेलं आहे. त्यामुळे त्या शिवसेनेत प्रवेश करतील अशी अटकळ बांधली जात होती. त्यांनी काँग्रेसची उमेदवारी नाकारत शिवसेनेची ऑफर स्विकारली होती. उर्मिल यांनी काँग्रेसकडून लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा पराभव झाला होता. नंतर त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उर्मिला यांना फोन करून त्यांचं आमदारकीसाठी मन वळवलं होतं. उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेसच्या तिकीटावर गेल्या वर्षी लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र, भाजप नेते गोपाळ शेट्टी यांनी उर्मिला यांचा दारूण पराभव केला होता. यानंतर काँग्रेसमधील अंतर्गत राजकारणामुळे उर्मिला यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर उर्मिला या शिवसेनेच्या संपर्कात असल्याची जोरदार चर्चा आहेत. त्यात आता खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोनवरुन उर्मिला मातोंडकरशी चर्चा केल्यानं त्यांनी विधान परिषदेसाठी होकार दिला होता. त्यामुळे उर्मिला या पक्षात आल्यात तर त्याचा फायदा होण्याची शक्यता असल्याने त्यांना शिवसेने घेण्याचा विचार झाला असावा अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.