औरंगाबाद (वृत्तसंस्था) नाथाभाऊ ज्येष्ठ आणि अभ्यासू नेते आहेत. त्यांचा उपयोग विरोधकांवर तोफ डागण्यासाठी करुन घेऊ नये. त्यांचा उपयोग भल्यासाठी करुन घ्यावा, असा सल्ला रावसाहेब दानवे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसला दिला आहे.
माध्यमांशी बोलतांना दानवे म्हणाले की, खडसेंचा उपयोग हा राज्याच्या भल्यासाठी करुन घ्यावा, विरोधकांवर टीका करण्यासाठी करु नये. कोणाच्या रोखल्याने कोणी रोखले जात नसते. ज्यांनी त्यांच्यावर आरोप केले. त्याच पक्षात जाण्याची त्यांच्यावर वेळ आली आहे. त्यांनी जाऊ नये यासाठी अनेक प्रयत्न केलेत. आमच्या सरकारमध्ये पारदर्शक काम झाली आहेत. कुणी कितीही आरोप केला तरी त्याचा परिणाम आमच्यावर होत नाही. आम्हाला उत्तर महाराष्ट्राची चिंता नाही. पण नाथाभाऊ गेल्याचे दु:ख आहे, असेही रावसाहेब दानवेंनी सांगितले. एवढेच नव्हे तर नाथाभाऊ माझे चांगले मित्र आहेत. मी त्यांच्या प्रत्येक वाढदिवसाला जातो. त्यांच्या शेतात, फार्महाऊसवरही जातो. ते पंढरपूरला आल्यावर माझ्या घरी येतात. आम्ही अगदी घरगुती संबंध आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
















