जळगाव (प्रतिनिधी) राष्ट्रीय सेवा योजना विभाग, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व श्रीमती प. क. कोटेचा महिला महाविद्यालय, भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेचे उद्घाटन व उद्बोधन विद्यापीठ स्तरीय कार्यशाळा संपन्न झाली. याप्रसंगी बोलताना माननीय मुख्यमंत्री यांचे सल्लागार मा. डॉ दीपक म्हैसेकर म्हणाले की, जीवनात कोरोनाच्या या परिस्थितीपासून आपल्या कुटुंबाची काळजी घेण्यासाठी त्री सूत्रांचा वापर करणे आवश्यक आहे. ते तीन सूत्र म्हणजे मास्कचा वापर करा, सतत हात स्वच्छ धुवा व शारीरिक अंतर पाळा. शासकीय स्तरावरून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती त्यांनी यावेळी सहभागी स्वयंसेवकांना करून दिली.
या कार्यशाळेत औरंगाबाद येथील कोव्हीड तज्ञ डॉ. कौस्तुभ सोडाणी यांनी कोव्हीड 19 चे संभाव्य धोके व घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन केले. हे मार्गदर्शन करत असताना त्यांना आलेले अनुभव, रुग्णांची व त्यांच्या कुटुंबियांची मानसिकता कशा स्वरूपाचे असते हे अनेक उदाहरणाद्वारे त्यांनी सांगितले. कोरोना काळात रुग्णांचा सकारात्मक विचार आजार नियंत्रित करण्यासाठी खूप आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. माक्स कोणता व कसा वापरावा व कोणकोणते दक्षता घ्यावी जेणेकरून आपले कुटुंब सुरक्षित राहू शकते, याविषयी साध्या सोप्या भाषेत विविध उदाहरणासह त्यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्र. कुलगुरु मा. प्रा. पी. पी. माहुलीकर होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे माझे कुटुंब माझी जबाबदारी यां मोहिमेचे समन्वयक डॉ. अनिल बारी यांनी या मोहिमेच्या संदर्भात माहिती दिली.
तर संचालक डॉ. पंकज नन्नवरे यांनी आज पर्यंत राष्ट्रीय सेवा योजना विभागाने राबविलेल्या विविध उपक्रमांची व सहभागी स्वयंसेवकांची माहिती संख्यात्मक व गुणात्मक स्वरुपात सादर केली.
राज्य संपर्क अधिकारी, रासेयो कक्ष,महाराष्ट्र शासन मंत्रालय, मुंबईचे मा. प्राचार्य डॉ. अतुल साळुंखे सर यांनी कोरोना संदर्भात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांनी केलेल्या कार्याच्या संदर्भात कौतुक केले. तसेच माझे कुटुंब माझी जबाबदारी यासंबंधी घ्यावयाच्या उपक्रमाच्या संदर्भात मार्गदर्शन केले.
प्रमुख अतिथी युवा अधिकारी क्षेत्रीय कार्यालय पुणे मा. श्री अजय शिंदे यांनी शासकीय तसेच युवापिढीने केलेल्या कार्याचा आढावा सादर केला. यावेळी प्रमुख अतिथी राष्ट्रीय सेवा योजना विभाग संचालक महाराष्ट्र व गोवा येथील या. श्री. डी. कार्तिगेन उपस्थित होते. श्री सरस्वती विद्या प्रसारक मंडळाच्या अध्यक्ष मा. श्रीमती पद्मा मोतीलाल कोटेचा व मा. श्री संजयजी सुराणा यांची उपस्थिती व प्रेरणा या कार्यक्रमासाठी प्राप्त झाली. या कार्यशाळेत 874 व्यक्ती सहभागी झालेल्या होत्या. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. मंगला साबद्रा यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. माधव कदम यांनी केले तर आभार कार्यक्रमाच्या समन्वयक प्रा. डॉ. शुभांगी राठी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माझे कुटुंब माझी जबाबदारी चे समन्वयक डॉ. अनिल बारी, डॉ. प्रशांत कसबे तसेच महिला महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. एस.सी. पाटील, उपप्राचार्य डॉ. जे. व्ही. धनवीज, डॉ. एस.के. अग्रवाल , डॉ. मीना चौधरी व भुसावळ विभागीय प्रमुख डॉ. अनिल सावळे यांचे सहकार्य लाभले. तसेच तांत्रिक बाबींसाठी विशेष सहकार्य डॉ. गिरीश कोळी यांचे लाभले. तसेच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्याचे जिल्हा समन्वयक व सर्व विभागीय समन्वयक यांच्या सहकार्यातून हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.