लखनऊ (वृत्तसंस्था) उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना कोरोनाची लागण झाली आहे. योगी आदित्यनाथ यांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून याबाबत त्यांनी स्वत: ट्विटरवरून माहिती दिली आहे.
मला काही दिवसांपासून कोरोनाचे लक्षण दिसत होती. त्यानंतर मी चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली आहे. कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर मी विलीगकरणात आहे. तसेच डॉक्टरांनी दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करत आहे. तसेच माझी सर्व काम ऑनलाईन करत आहेत. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी, असे आवाहन योगी आदित्यनाथ यांनी केले आहे. योगी आदित्यनाथ यांनी मंगळवार (१३ एप्रिल) पासून आयसोलेट झाले होते. तेव्हापासूनच ते सर्व कामकाज ऑनलाईन किंवा व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून करत होते. तसेच कोरोनाचा आढावा घेण्यासाठी होणाऱ्या बैठकीला त्यांनी ऑनलाईन संबोधित केले होते.
अखिलेश यादव यांनाही कोरोनाची लागण
समाजवादी पार्टीचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अखिलेख यादव यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. अखिलेख यादव यांनी स्वत: ट्वीट करत याबाबतची माहिती दिली. नुकतंच माझ्या कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मी घरीच विलगीकरणात उपचार घेत आहे, असे ट्वीट अखिलेश यादव यांनी केले आहे.