नवी दिल्ली (वृत्तसंस्था) खलिस्तान समर्थकांकडून रोममधील भारतीय दूतावासात तोडफोड करण्यात आली आहे. या तोडफोडीच्या प्रकाराबद्दल भारताने इटलीकडे तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे. ही घटना प्रजासत्ताक दिन साजरा होण्याच्या काहीवेळ आधी घडली. खलिस्तानी तत्त्वांनी भारताच्या प्रजासत्ताक दिन सोहळयाच्या काही वेळ आधी इटलीतील रोममधील भारतीय दूतावासाच्या इमारतीत घुसून तोडफोड केली. तसेच हल्लेखोर खलिस्तानचे झेंडे घेऊन आले होते.
तोडफोड करणारे हल्लेखोर खलिस्तानचे झेंडे घेऊन आले होते. ‘खलिस्तान झिंदाबाद’ म्हणूनही त्यांनी भिंतीवर लिहिले होते. या तोडफोडीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. “तोडफोडीचा हा विषय आम्ही लावून धरला आहे तसेच याबद्दल वाटणारी चिंताही त्यांना कळवली आहे. इमारत परिसर आणि सर्व भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी इटली सरकारची आहे” असे सूत्रांनी सांगितले. कृषी कायदे रद्द करण्यासाठी सरकारवरील दबाव वाढवण्यासाठी शेतकऱ्यांनी काल ट्रॅक्टर रॅली काढली होती. त्यावेळी दिल्लीच्या वेगवेगळया भागात मोठया प्रमाणात हिंसाचार झाला. शेतकऱ्यांनी काल कृषी कायदे रद्द करण्यासाठी सरकारवरील दबाव वाढवण्यासाठी ट्रॅक्टर रॅली काढली होती. त्यावेळी दिल्लीच्या वेगवेगळया भागात मोठया प्रमाणात हिंसाचार झाला. सार्वजनिक मालमत्तेचे या हिंसाचारात नुकसान तर झालेच शिवाय तब्बल ३०० पेक्षा अधिक पोलीस कर्मचारी देखील जखमी झाले आहेत. यापैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे समोर आले आहे. या हिंसाचाराप्रकरणी आतापर्यंत २२ गुन्हे नोंदवण्यात आले असून, पोलिसांकडून हिंसाचारास कारणीभूत असलेल्यांचा शोध सुरू आहे. या दरम्यान दीप सिद्धू याच्याबरोबरच गँगस्टर लक्खा सिंह सिधाना याचे नाव देखील समोर आले आहे. सामाजिक कार्यकर्ते मेधा पाटकर, योगेंद्र यादव तसेच राकेश टिकैत यांच्यासह २६ शेतकरी नेत्यांवर प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीत झालेल्या हिंसाचारप्रकरणी दिल्ली पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. दिल्ली पोलिसांनी याबाबत माहिती दिली आहे.
















