जळगाव (प्रतिनिधी) सलीम इनामदार यांनी उपमहापौर सुनील खडके यांची नववर्षांच्या पार्श्वभूमीवर शुभेच्छा देऊन वार्डातील समस्याबाबत चर्चा केली. याप्रसंगी उपमहापौर खडके यांनी मेहरूणमधील विविध समस्यांवर लवकरच तोडगा काढुन त्यांचे निराकरण करण्याचे आश्वान दिले.
शहरातील मेहरूणमधील विविध समस्याचे निवारण करण्यासाठी उपमहापौर सुनील खडके यांची राष्ट्रवादीचे सलीम इनामदार यांनी शुक्रवारी भेट घेतली. यात वॉर्ड क्रमांक १८ (मास्टर कॉलनी, अकसा नगर परिसर) मधील विविध समस्याबाबत त्यांना अवगत केले. याप्रसंगी वसीम खान हे देखील उपस्थित होते. विशेष करून रस्त्यावरचे बंद दिवे (स्ट्रीट लाईट) बाबत तक्रार केली असता उपमहापौर खडके यांनी विद्युत विभागाचे एस. एस. पाटील यांच्याशी दुरध्वनीद्वारे संपर्क साधून सूचना दिल्यात. यानुसार आज शनिवारी वार्डात काही प्रमाणात स्ट्रीट लाईट बसविण्यात आले आहेत.
















