मुंबई (वृत्तसंस्था) अभिनेता वरुण धवन आणि नताशा दलाल रविवारी (२४ जानेवारी) म्हणजेच आज लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. दोघेही अलीबागच्या शानदार रिजॉर्ट ‘द मेंशन हाउल’ मध्ये बोहल्यावर चढतील. शनिवारी वरुण-नताशाची मेंदी, संगीत सारखे लग्नाचे विधी झाले आहेत. मात्र आज लग्नासाठी जुहूवरुन अलिबागला रवाना होत असताना वरूणच्या गाडीला अपघात झाला आहे. सुदैवाने यामध्ये त्याला दुखापत झालेली नाही. या अपघातात वरुण थोडक्यात बचावला आहे.
वरून आणि नताशा फार काळापासून एकमेकांना डेट करत आहे. अनेक वर्षांच्या रिलेशनशीपनंतर हे दोघे विवाह बंधनात अडकत आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या लग्नाची चर्चा रंगली. आज अखेर ते लग्न करत आहेत. लग्ना पूर्वीच्या विधिंसाठी धवण आणि दलाल कुटुंब अलिबागला पोहोचले होते. अलीबाग येथील ‘द मेंशन हाउस’मध्ये त्यांचा विवाह सोहळा रंगणार आहे. या लग्नसोहळ्यात केवळ ५० जणांनाच आमंत्रण देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. या लग्न सोहळ्यात अनेक दिग्गज कलाकारही उपस्थित राहणार आहेत.
तसेच वरुण-नताशाच्या ग्रँड संगीत सेरेमनीला करण जोहरने होस्ट केले होते. या संगीत सेरेमनीमध्ये आलिया भट, जान्हवी कपूर, अर्जुन कपूर आणि इतर अनेक लोकांनी डान्स परफॉर्मेंस दिला. नवरदेव-नवरी वरुण-नताशा यांनीही एका रोमँटिक गाण्यावर स्पेशल डान्स परफॉर्मेंस दिला होता.