मुंबई (वृत्तसंस्था) अलिबागचे इंटेरियर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना अटक करून न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. नाईक यांच्या पत्नी आणि मुलीचे खाजगी आयुष्यातील फोटो भाजपच्या आयटी सेलच्या पदाधिकाऱ्याने व्हायरल केले आहेत. तसेच आक्षेपार्ह भाषा देखील वापरली आहे. यावर युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी टीका केली आहे.
या ट्विटवर वरुण सरदेसाई यांनी आक्षेप घेत भाजपाच्या आयटी सेल वाले काही ही पसरवत आहे. मराठी माणसाच्या मागे उभे राहायचे सोडून हे असले सुचते कसे? असा सवाल करत निषेध व्यक्त केला आहे केला आहे. तसेच दुसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि महाराष्ट्र सायबर सेल व ट्विटरला टॅग करत या व्यक्तीवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. महिलांच्या खासगी आयुष्यातील फोटो तिच्या परवानगी शिवाय पोस्ट करणार्यावर ही कारवाई करा, अशी मागणी वरुण सरदेसाई यांनी केली आहे.
सतीश निकम नावाच्या अकाउंट वरून आज्ञा अन्वय नाईक यांचे इंस्टाग्राम वरील फोटोंचे स्क्रीन शॉट पोस्ट करण्यात आले आहेत. यामध्ये अन्वय नाईक यांच्या पत्नीचे फोटो आहे तसेच या ट्विट वरील पोस्टमध्ये नाईक यांची पत्नी आणि मुलगी ने घेतलेल्या पत्रकार परिषदेत वरून देखील टीका करण्यात आली आहे.