मुंबई (वृत्तसंस्था) मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयानं वेगळी छाप सोडणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री ‘सीमा देव’ यांची प्रकृती अचानक खालावली आहे. सीमा यांचा मुलगा अभिनेता अजिंक्य देवने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत याबद्दल माहिती दिली आहे. अनेक दशकांपासून सीमा आणि रमेश देव यांनी अनेक चित्रपटांमधून रसिकांचं मनोरंजनच नाही तर घरातील प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे.
अजिंक्य देव आपल्या पोस्ट मानले कि, “माझी आई श्रीमती. सीमा देव अल्झायमर आजराने ग्रस्त आहेत. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून आम्ही तिच्यावर खूप प्रेम करतो. त्यांची तब्येत चांगली राहावी याकरता संपूर्ण देव कुटुंबीय प्रार्थना करत आहेत, ज्या महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांनी त्यांच्यावर प्रेम केलं त्यांनीही त्यांच्याकरता प्रार्थना करावी असं आवाहन अजिंक्य देव यांनी केलं आहे.