जळगाव (प्रतिनिधी) कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील कंत्राटी सुरक्षा रक्षकांना लॉकडाउनमध्ये घरी रहावे लागले, त्याना पगार दिला गेला नाही, तरी ते निमूटपणे गप्प बसले. यावरून आक्रमक होत आदरणीय कुलगुरू साहेब सेक्यूरिटी गार्ड यांचे पगार होणार कधी ?, असा सवाल विद्यार्थी संघटनांनी विचारला आहे.
विद्यार्थी संघटनांनी म्हटले आहे की, विद्यापीठमध्ये सुरक्षा रक्षकाचा ठेकेदार इंगल हंटर कंपनीला दिला आहे. त्यांना अजून दोन कामाचे ठेके दिले आहेत. पण त्यासाठी लागणारे कर्मचारी हे आपल्या जिल्ह्यातील आहेत. कर्मचाऱ्यांचे पीएफ बोनस, ईएमआय भत्ता, मेडिकल बिल, workman compansation, कपडे, त्याचा धुलाई भत्ता, नवीन बूट, नवीन ड्रेस, ओवर टाइम ह्याचे ठेकेदाराने पैसे घेतले. पण प्रत्यक्षात मात्र त्यांना काय नरक यातना दिल्या जात आहेत. ह्याची आपल्याला जाणीव आहे का ? …त्या संबंध आपण किवा आपल्या सहीच्या मंजुरीने ज्याला एक सदस्यीय समितीचा मुख्य बनला, असा एक सिनेट मेंबर ह्याने तरी त्या कर्मचारी वर्गाची चौकशी केली का ? …की फक्त ठराव करतानाच विद्यापीठ व सिनेट सदस्य ह्यांची कायदा व विधी विभागाचा सल्ला न घेता बिल पास करण्यासाठी तेवढीच आपली गरज म्हणून ठेकेदारास बोलवले जाते, असे विद्यार्थी संघटनांनी म्हटले.
तसेच बिल निघाले की भेटले की नाही, ठेकेदार सुरक्षा रक्षक याना पैसे देतो की नाही, आपण कधी चौकशी केली आहे का ?, त्या कर्मचारी वर्गाला रात्री ड्यूटी करताना काय त्रास होतो, याचा आपण कधी मागोवा घेतला आहे का, व जर कोणी सुरक्षा रक्षक ह्या प्रकरणा विषयी बोलला तर त्याला कामावरून कमी केले जाते, त्याचा प्रवेश बंद केला जातो, असा अन्याय का केला जातो, मुळात आपल्या कडे गार्ड बोर्ड समितीचा कायदा लावला जात नाही, कामगार आयुक्त म्हणतात विद्यापीठ म्हणते की आमची शैक्षणिक संस्था आहे. आम्हाला हा कायदा लागू होत नाही, पण ठराव करताना मात्र गार्ड बोर्ड समितीचा कायदा लावण्यासाठी बैठक बोलावली जाते पण तसे होत नाही, यामागे नेमके काय आहे?, याचे सविस्तर वर्णन आपण जाहीररित्या सर्वाना करावे, अशी मागणी देखील विद्यार्थी संघटनांनी केली आहे.
















