जळगाव (प्रतिनिधी) दूध उत्पादक संघाने प्रतिलिटर दोन रुपयांनी दूध स्वस्त केले आहे. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर दूध संघाने दुध स्वस्त केल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. संचालक मंडळाने हा निर्णय घेतला आहे. दि.११ पासून नवे सुधारित दर लागू होतील, अशी माहिती अध्यक्ष आ. मंगेश चव्हाण व कार्यकारी संचालक शैलेश मोरखडे यांनी कळविले आहे.
जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (विकास दूध) यांनी ग्राहकांसाठी विकास स्मार्ट, विकास शक्ती, विकास ताजा तसेच विकास लाईट यामध्ये लिटर मागे किमान २/- रूपये कपात करून २०२४ च्या पहिल्या सनाला ग्राहकांसाठी गोड बातमी दिली आहे. जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या वतीने ग्राहकांसाठी विकास दूध प्रती लिटर २/- रूपयांनी स्वस्त करण्यात आले आहे.
जळगाव जिल्हयातील दूध उत्पादक संघ ही शेतक-यांची आणि ग्राहकांची एक विश्वासाची सहकारी संस्था म्हणून ओळखली जाते. विकास दूध हे ग्राहक आवडीने खरेदी करित असतात, कारण ते ताजे तसेच अतिशय उत्तम दर्जाचे असल्याने ग्राहकांचा आणि शेतक-यांचा दूध उत्पादक संघावर गेल्या अनेक वर्षापासून विश्वास कायम आहे. नवीन वर्षात जिल्हा दूध संघाने ग्राहकांसाठी विकास दूधाच्या दरात प्रति लिटर २/- रूपये कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दर कपातीबाबत नुकताच संचालक मंडळाच्या वतीने निर्णय जाहिर करण्यात आला असून दि. ११ जानेवारी २०२४ पासून हे दर लागू करण्यात येणार आहे अशी माहिती जळगांव जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघाचे चेअरमन आमदार मंगेश चव्हाण व कार्यकारी संचालक शैलेश मोरखडे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात नमुद करण्यात आले आहे. यामुळे ग्राहकांना नव्या वर्षाची गोड बातमी दूध संघाच्या वतीने देण्यात आलेली आहे. जास्तीत जास्त ग्राहकांनी संघाच्या या दर कपातीचा लाभ घ्यावा असे आवाहन संघातर्फे करण्यात आले आहे. सदरील दर कपात ग्राहकांना दि.११.०१.२०२४ पासून लागू होईल.
















