धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील साळवा गावाचे शेत शिवारात गावठी हातभट्टीची दारू पोलिसांनी उद्ध्वस्त केली. यावेळी पोलिसांनी ४ हजार ५०० रुपयांची गावठी हातभट्टीसाठी लागणारे रसायन उद्ध्वस्त केले असून सुरेश चंद्रसिंग भिल या आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धरणगाव पोलिसांनी साळवा शेत शिवारात असलेला गावठी दारू तयार करण्याचा अड्डा नष्ट केला आहे. तसेच धरणगाव तालुक्यात गावठी हातभट्टीची दारु आढळून आल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असा सक्त इशारा दारू विक्रेत्यांना देण्यात आला आहे. ही कारवाई करताना पोलीस निरीक्षक शंकर शेळके, राजेंद्र सोनार, विनोद सदाशिव व अधिक कर्मचारी उपस्थित होते.