मुंबई (वृत्तसंस्था) भाजपाचे नेते माजी मंत्री विनोद तावडे यांची भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत सचिवपदी निवड झाली. आज भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
हा सोहळा सर्वांना सोशल मीडियाच्या ट्विटर, फेसबुक साईटवरून लाईव्ह पाहता येणार आहे. या सोहळ्याला खासदार गोपाळ शेट्टी, आमदार प्रवीण दरेकर, आमदार अतुल भातखळकर, आमदार योगेश सागर, आमदार मनीषाताई चौधरी, आमदार भाई गिरकर, आमदार सुनील राणे उपस्थित राहतील.