जामनेर (प्रतिनिधी) शहरातील सेंट्रल बोहरा स्कुलमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार श्रीराम दयाराम पाटील यांच्या प्रचार्थ विचार, विनिमय आणि नियोजनासाठी विना परवाना बैठक आयोजित केल्याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक असे की, दि. १३ एप्रिल रोजी सायंकाळी शहरातील सेंट्रल बोहरा स्कुलमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार श्रीराम दयाराम पाटील यांच्या प्रचार्थ विचार, विनिमय आणि नियोजनासाठी विना परवाना बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत अंदाजे ३०० ते ४०० कार्यकर्ते जमले होते. बैठकीच्या ठिकाणी वाद्यांची कोणतीही परवानगी न घेता माईक व स्पीकर लावून कार्यकर्त्यांना निवडणुक विषयी संबोधित करून उपस्थितांसाठी जेवणाची व्यवस्था करुन आर्दश आचारसंहितेचे उल्लंघन केले आहे. या प्रकरणी प्रदीप सुरेश धनके (वय ४०, नोकरी स्थापत्या अभियंता नगरपरिषद, जामनेर) यांच्या फिर्यादीवरून किशोर श्रीराम पाटील (जामनेर तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी कॉग्रेस शरद पवार गट, रा. सोनारी जामनेर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ अनिल चाटे हे करीत आहेत.
आदर्श आचार संहिता सुरु आहे. कुणालाही काहीही कार्यक्रम घ्यायचा असेल तर कायद्याप्रमाणे सर्व परवानग्या घेवूनच कार्यक्रम घ्यावा. उल्लघन केल्यास कारवाईला सामोरे जावेच लागेल. व्हिडीओ शुटींगचा अहवाल आल्यानंतर ज्यांचा ज्यांचा सहभाग आढळून येईल, त्यांच्याविरुद्धही कारवाई करण्यात येईल.
-किरण शिंदे (पोलीस निरीक्षक, जामनेर)
















