साकळी ता. यावल (प्रतिनिधी) तालुक्यातील अट्रावल येथील जागृत मुंजोबा देवस्थान येथील यात्रा मराठी माघ महीना दिनांक १३ फेब्रुवारी २०२१ पासुन ते माघ पोर्णीमा २७ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत संपन्न होणारी यात्रा रद्द करण्यात आली आहे.
यावल येथील तहसील कार्यालयात तहसिलदार महेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक ३ फेब्रुवारी २०२१ रोजी एक बैठक संपन्न झाली. यात महाराष्ट्र राज्यातील जागृत देवस्थान असलेल्या मुंजोबा देवस्थानाची पुढील महीन्यात संपन्न होणारी यात्रा ही संपुर्ण जगासह भारतात आणि आपल्या राज्यात मागील ७ महीन्यांपासुन कोरोना विषाणु संसर्ग महामारीच्या पार्श्वभुमीवर राज्यात संचारबंदी लावण्यात आली असुन महाराष्ट्र शासनाच्या लागु केलेल्या नियमांचे अधिन राहुन यंदाचे यात्रोत्सव रद्द करण्याचा निर्णय तहसीलदार महेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या बैठकीत घेण्यात आला. यात्रोत्सवाच्या निमित्ताने देवदर्शनासाठी येणारे महाराष्ट्र राज्यासह मध्यप्रदेश, गुजरात या राज्यातुन लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. नवसाला पावणारा मुंजोबा अशी मंदीराची ख्याती असल्याने नवस देण्यासाठी भाविक महत्वाचे असे शनिवार व सोमवार हे दोन दिवस खुप अतोनात गर्दी या अट्रावल येथील मुंजोबा देवस्थानावर असते. मात्र यंदा कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमीवर गर्दी टाळण्यासाठी भाविकांनी इतर दिवशी देखील दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन मुंजोबा यात्रोत्सव समितीच्या वतीने करण्यात आली आहे.
कोरोना या मानवी जिवनाला अत्यंत घातक ठरलेल्या या महामारीतुन भाविकांचा बचाव व्हावा यासाठी सदरची यात्राही रद्द करण्यात आली असुन यावेळी यात्रेत उपलब्ध होणारे आकाश पाळणे, लहान मुलांच्या खेळण्याची दुकाने, महीलासाठी मिळणारी संसार उपयोगी कटलरी वस्तुंची दुकाने, लाकडी तसेच इतर साहित्यची दुकाने, नाशत्यासाठी असलेली हॉटेल्स, थंडपेय विक्रीची दुकाने यांना परवानगी दिली जाणार नाही. कोणी विनापरवानगी दुकाने टाकतांना आढळल्यास त्यावर संचारबंदी नियमांचे उल्लघन कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येणार असुन नागरीकांनी याची काळजीपुर्वक खबरदारी म्हणुन कारवाई करण्यात येणार असल्याचे बैठकीत तहसीलदार महेश पवार यांनी संपन्न झालेल्या पोलीस प्रशासना आणि महसुल प्रशासनाच्या माध्यमातुन सांगण्यात आले आहे. बैठकीस जेष्ठ पोलीस उप निरिक्षक ए आर पठान, पोलीस उपनिरिक्षक विनोद खांडबहाले तसेच देवस्थानाचे विश्वस्त पदाधिकारी ललीत कोळी, दिपक तायडे, प्रभाकर कोळी, अनिल कोळी, जनार्दन कोळी, विक्रम कोळी व अट्रावल पोलीस पाटील पवन चौधरी उपस्थित होते.