बीड (वृत्तसंस्था) आडस येथील आरोग्य शिविरास भेट देऊन घरी परतताना भरधाव कार झाडाला धडकून झालेल्या अपघातात दोन डॉक्टर ठार झाले. हा भीषण अपघात शुक्रवारी दुपारी झाला. हा अपघात इतका भयानक होता की कारचा चक्काचूर झाला होता.
अंबाजोगाई येथील फिजिओथेरपिस्ट डॉ. प्रमोद बुरांडे व त्यांच्यासोबत असलेले डॉ. रवी सातपुते हे आडस येथे शिबिरास भेट देण्याठी गेले होते. आरोग्य शिबीर सुरुळीत सुरू असल्याचं पाहून ते घरी परत जात होते. तेवढ्यात चनईकडे जाताना उताराला समोरून येणाऱ्या आयशर वाहनाला चुकवताना वाहन रस्त्यालगत झाडावर धडकले. यात डॉ. बुरांडे हे जागीच ठार झाले. तर डॉ. सातपुते यांचा स्वारातीत उपचार सुरू असताना मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांनी तत्काळ मदतीसाठी घटनास्थळावर धाव घेऊन जखमींना रुग्णालयात पाठवले.