साकळी ता. यावल (प्रतिनिधी) हजयात्रा २०२१ साठी अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत येत्या १० जानेवारी २०२१ पर्यंत वाढ करण्यात आली आहे. पूर्वी ही मुदत १० डिसेंबर पर्यंत देण्यात आली होती. आता मात्र ही मुदत १० जानेवारी पर्यंत वाढ करण्यात आल्याचे अल्पसंख्यांक विभागाचे केंद्रीय मंत्री मुक्तार अब्बास नक्वी यांनी मुंबई येथील हज हाऊस येथे जाहीर केले.
अर्थात आतापर्यंत भारतातून ४३ हजार भाविकांनी हजयात्रा २०२१ साठी अर्ज दाखल केले अर्ज संख्या खूप कमी असल्याने पुन्हा १ महिना मुदतवाढ करण्यात आली आहे. या अर्जामध्ये विना मोहरम ५०० महिलांनी ही अर्ज दाखल केले असून विना सोडत त्यांचा हजयात्रेसाठी क्रमांक लागणार असल्याचेही प्रसंगी जाहीर करण्यात आले. अर्ज कमी दाखल झाल्याची कारणे म्हणजे कोरोना संसर्गामुळे निर्माण झालेली परिस्थिती याशिवाय यात्रेच्या खर्चात झालेली वाढ तरीही हज यात्रेच्या खर्चात ४० हजाराची कमी करण्यात आली आहे. खर्चात वाढीचे कारण म्हणजे तेथील गाईड ( मुअल्लीम) च्या फीस मध्ये दीड हजार सौदी रियाल ने वाढ करण्यात आली आहे. पूर्वी ही फीस १०५० रियल होते. आता अडीच हजार रियाल करण्यात आली आहे. दहा ठिकाणाहून जाण्याची व्यवस्था पूर्वी भारतातून हज यात्रेसाठी २१ ठिकाणाहून जाण्याची व्यवस्था होती. आता मात्र फक्त दहा ठिकाणाहून जाता येणार त्यात मुंबई, दिल्ली, अहमदाबाद, बेंगलोर, लखनऊ, हैदराबाद, कोचीन, श्रीनगर, कोलकत्ता आणि गोहाटी यांचा समावेश आहे. ज्या दहा ठिकाणाहून हज यात्रेला जाता येणार आहे. तेथून अपेक्षित खर्च याप्रमाणे मुंबई आणि अहमदाबाद ३ लाख ३० हजार बेंगलोर, लखनऊ दिल्ल, हैदराबाद ३ लाख ५० हजार, कोचीन श्रीनगर ३ लाख ६० हजार, कोलकत्ता ३ लाख ७० हजार, आणि गोहाटी ४ लाख हा खर्च कमी किंवा जास्त होण्याची शक्यता आहे.