मुंबई (वृत्तसंस्था) मुंबईमध्ये हल्ला ड्रोन किंवा मिसाइलच्या माध्यमातून मोठा दहशतवादी हल्ला होऊ शकतो. गुप्तचर विभागाच्या पत्रानंतर मुंबई पोलिसांनी अलर्ट जारी करुन सुरक्षेच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान, गुप्तचर विभागाचे इनपुट लक्षात घेता पोलिसांनी मुंबईमध्ये कोणत्याही फ्लाइंग ऑब्जेक्ट (उडवले जाणारे उपकरणे इत्यादी)वर बंदी घातली आहे.
मुंबई पोलिसांच्या डिप्टी कमिश्नर (ऑपरेशन) च्या कार्यालयाने जारी केलेल्या सतर्कतेनुसार दहशतवादी आणि राष्ट्रद्रोही लोक ड्रोन, रिमोट ऑपरेट मायक्रो लाईट एअरक्राफ्ट, एरियल मिसाईल किंवा पॅरा ग्लायडरच्या माध्यमातून हा हल्ला करू शकतात. अलर्टमध्ये ही देखील शंका व्यक्त केली आहे की, दहशतवादी गर्दीच्या ठिकाणी आणि व्हीव्हीआयपीला निशाणा बनवू शकतात. कायदा व्यवस्था बिघडवण्यासोबतच सार्वजनिक संपत्तीलाही नुकसान पोहोचवले जाऊ शकते.