जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील वाघूर धरण पूर्ण क्षमतेने भरले असून आज (शनिवार) सायंकाळी ५.०० वाजेपासून वाघूर धरणातून २०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. त्यामुळे वाघुर धरणाखालील नदीकाठच्या गावातील नागरीकांनी सतर्क राहून सावधानता बाळगावी, असा इशारा कार्यकारी अभियंता, जळगाव पाटबंधारे विभाग, जळगाव यांनी दिला आहे.
नदीपात्रामध्ये कोणीही गुरेढोरे सोडू नये अथवा प्रवेश करू नये, असेही कार्यकारी अभियंता, जळगाव पाटबंधारे विभाग, जळगाव यांनी कळविले आहे.