भुसावळ (प्रतिनिधी) शहरातील रानातला महादेव मंदिर परिसरात येथील तब्बल २५ दिवसांपासून नगरपालिकेचा पाणीपुरवठा होत नसल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. याबाबत परिसरातील नागरीक नगरपालिका प्रशासनासह नगरसेवकांवर प्रचंड संताप व्यक्त करत आहेत.
नगर पालिकेमार्फत पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन नॅशनल हायवे चौपदरीकरण करण्याचा काम सुरू असताना फुटली होती. तसेच वॉलपण तुटल्या असल्या कारणाने परिसरात पाणीपुरवठा खंडित झाला आहे. या परिसरातील नगरसेवक प्राथमिक सुविधा पुरविण्यात असमर्थ ठरल्यामुळे नागरिकांच्या मनात संतापाची लाट उसळली आहे. या परिसरातील नागरिक स्वतः पैसे खर्च करून पाण्याचे टँकर मागवत होते. नगरपालिकांना २५ दिवसात फक्त दोनच वेळा पाणीपुरवठा करणारे टँकर देण्यात आले होते. या परिसरात एकूण २५० वर घरे आहेत.