TheClearNews.Com
Friday, February 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पाण्यातून वाट काढत, चिखल तुडवत वीजपुरवठा केला सुरळीत !

महावितरणच्या कर्मचाऱ्यांची कर्तव्यनिष्ठा

The Clear News Desk by The Clear News Desk
October 3, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) वादळी पाऊस आणि विजेच्या कडकडाटामुळे शनिवारी पहाटे भडगाव तालुक्यातील तीन वीज उपकेंद्रे बंद पडून वीजपुरवठा खंडित झाला. महावितरणच्या जिगरबाज अभियंते व कर्मचाऱ्यांनी अक्षरश: चिखल तुडवत आणि ओढे-नाल्यातील पाण्यातून वाट काढत ३३ केव्ही वाहिनी दुरुस्त केली आणि वीजपुरवठा पूर्ववत झाला.

शनिवारी पहाटे ५ वाजेपासून पाचोरा – भडगाव परिसरात प्रचंड वादळी पाऊस व विजेच्या कडकडाट होता. त्यातच पाचोरा ते भडगाव या ३३ केव्ही उच्चदाब वाहिनीवर वीज पडल्यामुळे बिघाड झाला. त्यामुळे भडगाव, लोण पिराचे व वडजी ही तीन उपकेंद्रे बंद पडली आणि भडगाव तालुक्यातील जवळपास १० ते १२ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला. पाचोरा ते भडगाव या विद्युत वाहिनीचे अंतर १४ किमी आहे. बंद पडलेल्या ३३ केव्ही वाहिनीवर झालेला नेमका बिघाड शोधून तो दुरुस्त करणे जिकिरीचे होते आणि त्यासाठी वेळ लागणार होता. त्यामुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी पर्यायी मार्गाने दुपारी अडीच वाजेपर्यंत ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत केला. मात्र पर्यायी व्यवस्था ही तात्पुरती असल्याने बंद पडलेली वाहिनी सुरू करणे आवश्यक होते. मात्र रानावनातून जाणाऱ्या वाहिनीवरील बिघाड शोधणे सोपे नव्हते. पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी आणि चिखल झालेला. मात्र प्रतिकूल परिस्थितीचे आव्हान स्वीकारून आजच ही वाहिनी सुरू करायची असा चंग बांधून महावितरणचे कर्मचारी कामाला लागले. अक्षरश: चिखल तुडवत आणि ओढे-नाल्यांतील पाण्यातून वाट काढत त्यांनी बिघाड शोधण्यास सुरुवात केली. वाहिनीवरील प्रत्येक खांबावर चढून त्याचे इन्सुलेटर तपासले. तेव्हा वेगवेगळ्या खांबांवर जवळपास १६ इन्सुलेटर फुटल्याचे व पंक्चर झाल्याचे आढळून आले. ते सर्व इन्सुलेटर बदलण्यात आले. काम सुरू असताना अधूनमधून बरसणाऱ्या पावसाच्या सरीही महावितरण कर्मचाऱ्यांना अडवू शकल्या नाहीत. सकाळपासून तहानभूक विसरून काम करत महावितरणच्या जिगरबाज कर्मचाऱ्यांनी संध्याकाळी ६.५० वाजता पाचोरा-भडगाव ३३ केव्ही वाहिनीवरील वीजपुरवठा पूर्ववत केला.

READ ALSO

अपघाताचा बनाव करणाऱ्या आंतराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश

भुसावळमध्ये कार्यालयात कथित अत्याचार ; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

भडगाव उपविभागाचे प्रभारी उपकार्यकरी अभियंता रवींद्र राऊळ, भडगाव ग्रामीण कक्षाचे कनिष्ठ अभियंता विवेक जोशी, कोळगाव कक्षाचे सहायक अभियंता विजय पवार, पारोळा कक्षाचे कनिष्ठ अभियंता अनुज धर्माधिकारी, जनमित्र आनंदराव पाटील, वसीम अली, संदीप सोनवणे, भूषण पाटील, योगेश पवार, कपले, बाह्यस्रोत कर्मचारी सुनील भदाणे, मोहसीन अली, योगेश परदेशी, सय्यद अली, नरेंद्र राजपूत यांनी ही कामगिरी फत्ते केली. या कामगिरीबद्दल या सर्व अभियंते व कर्मचाऱ्यांचे जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता कैलास हुमणे, अधीक्षक अभियंता फारूक शेख, प्रभारी कार्यकारी अभियंता राम चव्हाण यांनी अभिनंदन केले आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अपघाताचा बनाव करणाऱ्या आंतराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश

February 20, 2026
गुन्हे

भुसावळमध्ये कार्यालयात कथित अत्याचार ; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

February 20, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
अमळनेर

अमळनेर येथील जी. एस. हायस्कूल येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९६ वी जयंती उत्साहात साजरी

February 19, 2026
जळगाव

जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित पिंगळवाडे येथे

February 19, 2026
जळगाव

अश्लिल व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत रेल्वे कर्मचाऱ्याकडून उकळले पैसे

February 19, 2026
Next Post

धरणगावातील 'त्या' अवैध दारूविक्रेत्यांविरुद्ध गुन्हा ; पोलिसांनी केले 'हे' आवाहन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

केंद्राने शेतकऱ्यांवर लादलेले निर्बंध उठवले नाही तर प्रत्येक तालुक्यात आंदोलन : ॲड. रविंद्र पाटील

December 5, 2020

रोज ४०० रुपये गुंतवा, एक कोटी मिळवा ; पोस्टाच्या ‘या’ भन्नाट स्किममध्ये करा गुंतवणूक !

December 25, 2021

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, ९ डिसेंबर २०२४ !

December 9, 2024

बुलढाण्यातील सिंदखेडराजा जवळ ट्रक आणि एसटीची समोरासमोर धडक ; 5 जणांचा मृत्यू, 13 जखमी !

May 23, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group