मेष : तुमचे विरोधक तुम्हाला ध्येयापासून दूर करण्याचा प्रयत्न करू शकतात. करिअर-व्यवसायात लक्षपूर्वक काम करा. या काळात तुम्हाला कौटुंबिक विषयांबाबत निर्णय घेण्यात काही अडचणी येऊ शकतात. आठवड्याच्या मध्यात काही घरगुती चिंता तुम्हाला सतावू शकतात. या आठवड्यात तुम्ही तुमचे आरोग्य आणि तुमचे नाते या दोन्हीकडे लक्ष दिले पाहिजे. चांगले लाभ सुद्धा होतील. शासनाकडून सुद्धा एखादा मोठा लाभ होऊ शकतो. विद्यार्थ्यांना हा आठवडा अनुकूल आहे.
वृषभ : नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी आठवडा अनुकूल आहे. ह्या आठवड्यात आपले खर्च वाढल्याने आपण चिंतीत व्हाल, परंतु आपल्या प्राप्तीत सुद्धा वाढ होणार असल्याने काळजी करू नये. व्यवसायाशी संबंधित कामामुळे अचानक लांबचा प्रवास करावा लागू शकतो. प्रवास सुखकर आणि लाभदायक ठरेल. या आठवड्यात हंगामी आजारांपासून सावध राहा आणि काळजीपूर्वक वाहन चालवा. वैवाहिक जीवन आनंदी राहील. कठीण प्रसंगी तुमचा जीवनसाथी तुमचा आधार असेल.
मिथुन : या आठवड्यात आर्थिकदृष्ट्या तुमच्या जवळचे कोणीतरी जर त्याने मदत मागितली, तर तुम्ही त्याला सर्व प्रकारे मदत कराल. राजकारणाशी संबंधित लोक आज संपर्क वाढवण्यात यशस्वी होतील. व्यापाऱ्यांनी मिळालेल्या संधीचा लाभ ग्यावा. त्यांना प्रगतीची संधी मिळेल. नशिबाची साथ मिळेल. तुमच्या संपत्तीत वाढ होईल. जर तुमचा वाहन खरेदीचा विचार असेल तर या आठवड्यात चांगली संधी आहे. विद्यार्थ्यांसाठीही हा आठवडा चांगला आहे अनेक नवीन गोष्टी शिकण्याच्या संधी मिळतील.
कर्क : या आठवड्याच्या सुरुवातीला रखडलेले काम पूर्ण होतील. आठवड्याच्या मध्यात कौटुंबिक जीवन तणावपूर्ण असू शकते. उत्पन्नात वाढ होईल. वैवाहिक जीवनात चांगला काळ येईल. व्यवसायात लाभ होईल. नशिबाची साथ मिळाल्याने आपली प्रलंबित कामे होतील व त्यामुळे आपली आर्थिक स्थिती मजबूत होईल. व्यवसायात तुम्हाला तुमच्या प्रतिस्पर्ध्यांकडून कठीण स्पर्धेला सामोरे जावे लागू शकते. या दरम्यान, कामाच्या संदर्भात लांब आणि थकवणारा प्रवास करावा लागेल.
सिंह : आठवड्याच्या मध्यात जवळच्या मित्रांच्या मदतीने काही मोठी कामे पूर्ण होतील. शक्तिशाली सरकारशी संबंधित प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीने लाभदायक योजनेत सहभागी होण्याची संधी मिळेल. व्यवसायाला पुढे नेण्याचे नियोजन प्रत्यक्षात साकार होताना दिसतील. जर तुम्हाला काही काळ आरोग्याशी संबंधित समस्येत लक्षणीय सुधारणा होणार आहे. ह्या आठवड्यात आपल्या वाणीत काहीसा कडवटपणा येऊ शकतो तेव्हा लोकांशी विचारपूर्वक वार्तालाप करावा. प्रवासामुळे आपणास लाभ होईल.
कन्या : या आठवड्यात भागीदारीत व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घ्याल. तुम्हाला तुमच्या काही जुन्या चुकीबद्दल पश्चाताप होईल आणि तुम्ही ती चूक सुधारण्याचा पूर्ण प्रयत्न कराल. प्राप्तीचा लाभ होईल. काही जुन्या योजना पुन्हा चालू झाल्याने आपणास थकबाकी सुद्धा मिळू शकते. आपण विरोधकांवर मात कराल. कोर्ट – कचेरीशी संबंधित बाबीत यश प्राप्ती होईल. मोठा निर्णय घेताना कुटुंबीयांचे पूर्ण सहकार्य मिळेल. जर तुम्ही खूप दिवसांपासून नवीन काम सुरू करण्याचा विचार करत असाल तर तुमची ही इच्छा पूर्ण होऊ शकते.
तूळ : आर्थिक दृष्ट्या सुद्धा स्थिती अनुकूल राहील. खर्चात कपात होईल. व्यापारात स्थिती अनुकूल असेल. आपण आपली कामे पूर्ण ताकदीने कराल. हंगामी आजारांपासून सावध राहा. याबरोबरच या काळात खाण्यापिण्याची खूप काळजी घ्या. तुमच्या समस्यांकडे पाठ फिरवण्याऐवजी तुम्ही त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करा. वैवाहिक संबंध चांगले ठेवण्यासाठी घाई करू नका आणि विचारपूर्वक पुढे जा. तुमचा जोडीदार कठीण काळात तुमच्या पाठीशी असेल. आठवड्याच्या उत्तरार्धात, जवळचे मित्र किंवा कुटुंबासह पिकनिक किंवा पार्टी आयोजित केली जाऊ शकते.
वृश्चिक : हा आठवड्यात आपणास नशिबाची साथ मिळाल्याने आपला आत्मविश्वास उंचावेल. नोकरीत स्थिती मजबूत होईल. व्यापारात यश प्राप्त झाल्यामुळे आपण खुश व्हाल व काही नवीन योजना आपण आखू शकाल. नवीन ठिकाणी तुमचा व्यवसाय वाढेल आणि तुमचा मुलगा त्याच्या करिअरमध्ये प्रगती करेल. कोर्ट-कचेऱ्याशी संबंधित प्रकरणांमध्ये मन चिंतेत राहू शकते. आठवड्याच्या मध्यात तुम्हाला अचानक घराच्या दुरुस्तीवर जास्त पैसे खर्च करावे लागतील.
धनु : या आठवड्यात तुम्हाला एकापेक्षा जास्त स्त्रोतांकडून पैशाचा फायदा होईल, ज्यामुळे तुमचा आनंद द्विगुणित होईल. व्यवसायात चांगला नफा मिळविण्यासाठी तुम्ही नवीनतम तंत्रज्ञानाचा वापर कराल. ह्या आठवड्यात आपले काही गुप्त खर्च सुद्धा होतील, जे आपल्या आर्थिक स्थितीस प्रभावित करतील. तेव्हा सावध राहावे. आठवड्याच्या मध्यात कुटुंबातील सदस्याच्या आरोग्याबाबत मन चिंतेत राहील. या काळात उत्पन्न कमी आणि खर्च जास्त होईल. यामुळे तुमचे बजेट थोडे गडबड होऊ शकते.
मकर : आठवड्याच्या पहिल्या भागाच्या तुलनेत दुसरा भाग आरामदायी असेल. या काळात पैशाच्या व्यवहारात सावधगिरी बाळगा आणि उधळपट्टी टाळा. नवविवाहित जोडपे आज कुठेतरी फिरण्याचा बेत आखतील. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना आज बहुराष्ट्रीय कंपनीकडून नोकरीची ऑफर मिळेल. नातेसंबंध विस्ताराच्या दृष्टीने प्रवास सुखकर आणि शुभ राहील. या काळात तुम्हाला घराच्या सजावटीसाठी किंवा दुरुस्तीसाठी तुमच्या खिशातून जास्त पैसे खर्च करावे लागतील.
कुंभ : आठवड्याच्या सुरवातीस एखादा मोठा खर्च संभवतो. वैवाहिक जोडीदारा बरोबर खरेदी करताना आपले अंदाज पत्रक कोलमडू शकते. तेव्हा विचारपूर्वक बाहेर पडावे. आठवड्याच्या दुसऱ्या भागात तुमची एखाद्या प्रभावशाली व्यक्तीशी भेट होईल, ज्याच्या मदतीने तुम्हाला भविष्यात लाभाच्या योजनांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल. व्यवसायासाठीही हा आठवडा चांगला आहे. सप्ताहाच्या मध्यात प्रेम जीवनासाठी वेळ चांगला असेल. तुमच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे.
मीन : आठवड्याच्या सुरुवातीला नशिबाची साथ मिळेल. त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. कामात यश मिळेल. या आठवड्यात एखाद्या व्यक्तीला भेटणे प्रथम मैत्रीत आणि नंतर प्रेम जीवनात बदलू शकते. बरेच दिवस अडकलेले पैसे परत मिळाल्याने तुमचे आर्थिक प्रश्न सुटतील. तुमच्या सासरचे कोणीतरी तुम्हाला भेटायला घरी येऊ शकते. व्यापाऱ्यांना शासना कडून काही लाभ संभवतो. आपण स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न कराल व त्यासाठी खूप परिश्रम सुद्धा घ्याल. आपल्या एखाद्या चुकीमुळे आपले काही गुप्त शत्रू सक्रीय होऊ शकतात.