मेष : व्यावहारिक कामे सुरळीत पार पडतील. वैवाहिक जीवनात जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. कचेरीची कामे मनाजोगी पार पडतील. कागदपत्रे नीट तपासून घ्या. आजचा दिवस आपल्यासाठी शुभ आहे. दिनांक १५, १६ रोजी ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत अशा गोष्टींच्या मागे लागू नका. आपल्या वैयक्तिक गोष्टी दुसऱ्यांना सांगणे टाळा. या दोन दिवसांत एखादी तरी गोष्ट मनाविरुद्ध घडते, त्यामुळे चिडचिड वाढते; तेव्हा संयम ठेवावा लागेल. व्यवसायातून मिळणाऱ्या नवीन उत्पन्नाच्या संधी फायद्याच्या असतील. नोकरदार वर्गाला कामाचा ताण कमी होईल. आर्थिकदृष्टय़ा बचतीकडे लक्ष द्या.
वृषभ : जोडीदाराकडून लाभ होतील. आवडीच्या गोष्टींना वेळ मिळेल. मित्रांशी मतभेद होण्याची शक्यता. गोडीने कामे साधून घेण्याचा प्रयत्न करावा. धार्मिक कामात हातभार लावाल. दिनांक १७, १८ हे संपूर्ण दिवस व १९ तारखेला दुपापर्यंत हा कालावधी फारसा चांगला असणार नाही. तुमच्याविषयी एखादी व्यक्ती पाठीमागे काही बोलत आहे असे तुमच्या कानावर ऐकायला आल्यावर त्याचा सोक्षमोक्ष लावायला जाऊ नका, कारण त्यातून गैरसमज वाढू शकतो. व्यावसायिकदृष्टय़ा उत्पन्न वाढेल. नोकरदार वर्गाच्या मनोकामना पूर्ण होतील. आर्थिकदृष्टय़ा फायदा होणार आहे, तसा खर्चही होणार आहे. समाजमाध्यमांद्वारे प्रसिद्धी मिळेल. चांगल्या कामाचे पारितोषिक मिळेल.
मिथुन : १९ तारखेला दुपारनंतर व २० तारखेला संपूर्ण दिवस असा हा दीडच दिवसांचा कालावधी फारसा अनुकूल नाही. त्यामुळे हा दीड दिवसांचा कालावधी जेमतेम राहील. कोणत्याच गोष्टीसाठी संघर्ष करावा लागणार नाही. अपेक्षित व्यक्तीकडून मदत मिळाल्यामुळे बरेच काही साध्य करू शकाल. चांगल्या कामासाठी उशीर न लावता ती कामे वेळेत कशी पूर्ण होतील ते पाहा. प्रत्येक गोष्टीत यश मिळेल. व्यवसायात नवीन योजनांचा लाभ होईल. नोकरदार वर्गाच्या कामात बदल होतील. राजकीय क्षेत्रात वरिष्ठांचा वरदहस्त राहील. धार्मिक गोष्टींसाठी खर्च कराल. आरोग्य उत्तम राहील. दुसर्यावर अवलंबून राहू नका. कामात त्रुटी राहणार नाही याची काळजी घ्या. आर्थिक कामे सावधानतेने करावीत.
कर्क : दिनांक १४ रोजीचा एकच दिवस सोडला तर बाकी दिवसांचा कालावधी उत्तम राहील. अमावास्या कालावधीत कामात गुंतून राहाल. ठरवून एखादी गोष्ट साध्य होत नाही ही तुमच्या मनाची भीती आहे. ही भीती प्रथमता काढून टाका, कारण सध्या चांगल्या कालावधीमध्ये जे ठरवणार आहात ते पूर्ण होणार आहे. आतापर्यंत ज्या कामांमध्ये अडथळे येत होते ते आता येणार नाहीत. त्यामुळे मनासारख्या गोष्टी घडतील. नोकरदार वर्गाची जबाबदारी वाढणार आहे. आर्थिकदृष्टय़ा लाभ होईल. राजकीय क्षेत्रात कार्यरत राहाल. नातेवाईकांच्या भेटीगाठी पडतील. काही गोष्टी लपविण्याकडे कल राहील. प्रकृती स्वास्थ्याकडे दुर्लक्ष करू नका.
सिंह : जवळच्या प्रवासाचा योग येईल. चांगले वाहन सौख्य लाभेल. भावंडांना भेटण्याचा योग येईल. वडीलधार्यांचा आशीर्वाद मिळेल. जोडीदाराचा स्वभाव आग्रही राहील. दिनांक १५, १६ हे दोन दिवस मनस्ताप होईल अशा गोष्टींपासून लांब राहा. ‘आपले काम भले नि आपण भले’ हेच सूत्र लक्षात ठेवा. कोणाची मध्यस्थी करायला गेलात तर तुमच्या प्रतिष्ठेला ठेच पोहोचू शकते हे विसरू नका. इतरांनी आपले ऐकून घ्यावे असे हे दोन दिवस नाहीत. त्यामुळे या दोन दिवसांत शांत राहा. बाकी दिवसांचा कालावधी चांगला जाईल. व्यवसायातून जो लाभ मिळालेला आहे. त्याचे गुंतवणुकीत रूपांतर करा. नोकरदार वर्गाच्या कामातील तांत्रिक अडचणी दूर होतील. आर्थिकदृष्टय़ा अनपेक्षित लाभ होईल.
कन्या : कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील. कामात घाई गोंधळ उडू शकतो. योग्य नियोजनावर भर द्यावा. काही गोष्टी अचानक घडू शकतात. पण प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक हाताळावे लागेल. तुमचा स्पष्टवक्तेपणा सध्या तुम्हाला नडणारा आहे. त्यामुळे डोक्यावर बर्फ आणि तोंडात खडीसाखर सर्वात उत्तम राहील. तुम्ही कितीही प्रामाणिक असला तरी हा प्रामाणिकपणा साध्य करण्याची वेळ नाही, हे लक्षात ठेवा. सध्या तुमची स्थिती इतरांचे ऐकून घेण्याची नाही. कोणाचे काही ऐकून घ्यायचे नसेल, तर कोणाला काही बोलायलाही जाऊ नका. व्यावसायिकदृष्टय़ा नेमक्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करा. खर्च कमी करा. प्रकृतीची काळजी घ्या.
तूळ : दिवस आपल्या मर्जीप्रमाणे घालवावा. व्यवसायानिमित्त प्रवास घडेल. अचानक धनलाभाच्या घटना घडतील. तुमच्या व्यक्तिमत्वावर लोक खुश होतील. कामात अधिक कष्ट पडतील. सध्या चंद्र ग्रहाची अनुकूलता फारशी चांगली नाही. ज्या गोष्टींची जबाबदारी घेणे जमणार नाही अशा गोष्टींची जबाबदारी घेणे त्रासाचे राहील. एखाद्या व्यक्तीने सल्ला मागितला तरच द्या. तुम्ही स्वत:हून द्यायला जाऊ नका. प्रत्येक गोष्टीमध्ये समतोल राखायला शिका, त्यामुळे त्रास होणार नाही. अमावास्या कालावधीत मध्यस्थी करायला जाऊ नका. व्यावसायिक स्तरावर धावपळ होईल. नोकरदार वर्गाचे कामात लक्ष लागणार नाही. खर्च बेताने करा.
वृश्चिक : मनाच्या चंचलतेला आवर घालावी. जोडीदाराच्या शब्दाला प्रमाण मानावे लागेल. भावंडांना मदत करावी लागेल. भागीदारीतून लाभ होईल. पतीच्या कमाईत वाढ होईल. दिनांक १७, १८ हे संपूर्ण दिवस, १९ तारखेला दुपापर्यंत असा हा अडीच दिवसांचा कालावधी फारसा चांगला आहे असे म्हणता येणार नाही. अशा कालावधीत आपल्या तोंडावर ताबा राहत नाही. परिणामी वादविवादाचे प्रसंग स्वत:हून आपण ओढावून घेतो. त्यासाठी सहनशीलता ठेवावी लागेल. तरच हे दिवस चांगले जातील. व्यवसायात परिश्रमाच्या मानाने कष्टाचे फळ कमी मिळेल म्हणून निराश होऊ नका. नोकरदार वर्गाने कामातील उत्साह टिकवून ठेवावा.
धनू : मनमोकळ्या गप्पा मारल्या जातील. तुमच्यातील साहस वाढेल. नवीन अधिकार सावधानतेने वापरा. इतरांवर अधिक विसंबून राहू नका. कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवा. १९ तारखेला दुपारनंतर २० तारखेला संपूर्ण दिवस अशा या दीड दिवसांच्या कालावधीत सतर्क राहावे लागेल. बाकी दिवसांचा कालावधी उत्तम जाईल. बरेच दिवस ज्या गोष्टींची तुम्हाला आतुरता होती त्या गोष्टी आता पूर्ण होणार आहेत. व्यावसायिकदृष्टय़ा आगामी काळाचा विचार करून दिवस वाया घालवू नका. नोकरदार वर्गाला नवीन कामाची सुरुवात करावी लागेल. आर्थिक संकल्पना मार्गी लागतील. सार्वजनिक ठिकाणी सामूहिक गोष्टींची आवड राहील. घरगुती वातावरण ठीक राहील.
मकर : कामाला चांगली गती येईल. गोड शब्दातून संवाद साधावा. कामातून चांगले समाधान मिळेल. हातातील कामात यश येईल. दिवस चांगल्या कमाईचा असेल. सर्वच दिवस चांगले असतील म्हणून काहीही करायला जाऊ नका. स्वत:चे काम सोडून इतरांच्या कामासाठी वेळ देणे म्हणजे तुमची महत्त्वाची वेळ निघून जाईल. प्रत्येक गोष्टीत तर्कवितर्क करत बसू नका, त्यामुळे गैरसमज वाढू शकतात. हा चांगल्या दिवसांचा कालावधी म्हणजे आपल्याला मिळालेली संधीच होय. व्यावसायिकदृष्टय़ा व्यवहार जपून करा. अनोळख्या व्यक्तीवर विश्वास ठेवू नका. नोकरदार वर्गाने कामाव्यतिरिक्त इतर गोष्टींत सहभाग टाळा. आर्थिक स्थिती चांगली राहील.
कुंभ : आर्थिक व्यवहार सतर्कतेने करावेत. घरात तुमचा रूबाब राहील. इतरांना परोपकाराचे महत्त्व पटवून द्याल. जोडीदाराच्या सल्ल्याने वागावे लागेल. बौद्धिक छंद जोपासता येतील. प्रत्येक आठवडय़ामध्ये काही दिवस चांगले असतात, तर काही दिवस फारसे अनुकूल नसतात. मात्र या सप्ताहात सर्व दिवसांचा कालावधी अनुकूल आहे. स्वत:च्या कर्तृत्वानेच बरेच काही साध्य होणार आहे. इतरांची मदत घ्यावी लागणार नाही. कामे अगदी सहज होत राहतील. कामातील अडथळे दूर होतील. व्यापारवृद्धी होईल. ठरवल्याप्रमाणे व्यावसायिक समीकरण जुळून येईल. आर्थिक नियोजन यशस्वी होईल. समाजसेवेची आवड राहील. शेजाऱ्यांशी मात्र जेवढय़ास तेवढे राहा.
मीन : जास्त अधीर होऊ नका. लष्कराच्या भाकर्या भाजायला जाऊ नका. कामाचा वाढता व्याप लक्षात घ्यावा. घरातील वातावरण खेळकर राहील. वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील. दिनांक १४ रोजीचा एकच दिवस सोडला तर बाकी दिवसांचा कालावधी उत्तम असेल. समोरून येणारा प्रस्ताव स्वीकारा. या प्रस्तावाला हो म्हणण्यासाठी उशीर करू नका. एकदा गेलेली वेळ परत येत नाही हे लक्षात ठेवा. व्यवसायात इतरांवर अवलंबून कोणतेही काम करू नका. त्यामुळे कामाला उशीर होऊ शकतो. नोकरदार वर्गाला काम करताना फारसा ताण द्यावा लागणार नाही. विचारपूर्वक खर्च करा. समाजसेवा करताना भान ठेवा.
















