मेष : दिनांक १८, १९ या दोन दिवशी घाई करून कोणतीही कृती करू नका. या दिवसांत टोकाचे निर्णय घेणे टाळा. क्रोधावर नियंत्रण ठेवा. स्पष्ट बोलण्याने इतरांची मने दुखावली जाऊ शकतात. तेव्हा शांत राहिलेले चांगले. व्यवसायात हिशोबाच्या नोंदी ठेवा. नोकरदार वर्गाने कामाचे वेळापत्रक प्रथम तयार करा. आर्थिक व्यवहार जपून करा. अक्षय्य तृतीयेदिवशी विशिष्ट अशी खरेदी कराल. या सप्ताहातील अमावस्या तुमच्या व्ययस्थानातून होत आहे. तेव्हा अमावस्या कालावधीत मोठी गुंतवणूक करणे टाळा. आर्थिक दृष्टीकोनातून काळ अनुकूल राहील आणि आर्थिक लाभाचा शुभ योगायोग या संपूर्ण आठवड्यात घडेल.
वृषभ : अक्षय्य तृतीया लाभस्थानातून होत आहे. जनसंपर्क वाढेल. व्यक्तिमत्त्व खुलेल. मोठय़ा खरेदीचे स्वप्न पूर्ण होईल. दिनांक २०, २१ रोजी ठरवून कोणतीही गोष्ट करू नका. त्यामुळे त्यात अडथळे येऊ शकतात. या कालावधीत बोलण्यावर नियंत्रण ठेवा. महत्त्वाच्या कामाची सुरुवात या दिवसांत करू नका. व्यवसायातील आवक-जावक वाढेल. व्यापारी वर्गाला दिलासा मिळेल. नोकरदार वर्गाला कामाचा आढावा घेताना वरिष्ठांची मर्जी राखावी लागेल. खर्चाची बाजू सांभाळा. कुटुंबात शांतता राहील आणि तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या सहवासात आनंददायी वेळ घालवाल.
मिथुन : अक्षय्य तृतीया दिवशी मात्र दिवस सांभाळून हाताळावा लागेल. कारण नसताना खर्च वाढू शकतो. दिनांक २२ रोजीचा एक दिवस सोडला तर बाकी दिवस उत्तम असतील. व्यावसायिकदृष्टय़ा नेहमीपेक्षा फायद्याचे प्रमाण जास्त असेल. त्यामुळे गुंतवणूक करणे सोपे होईल. नोकरदार वर्गाला कामामध्ये बढती मिळेल. आर्थिक लाभ होईल. घरगुती वातावरण आनंदी राहील. मानसिक समाधान लाभेल. एकूणच सप्ताह भाग्योदयाचा असेल. तुम्ही कुटुंबासोबत आनंददायी कार्यक्रमाला जाण्याचा किंवा धार्मिक प्रवासाला जाण्याचा निर्णयही घेऊ शकता.
कर्क : अक्षय्य तृतीयेचा दिवस शुभदायक असेल. या दिवशी अनपेक्षित असा लाभ होईल. व्यावसायिकदृष्टय़ा होत असलेली धावपळ कमी होईल. नवीन व्यावसायिक दालनाचा शुभारंभ होईल. नोकरदार वर्गाच्या कामकाजात बदल होतील. आर्थिक मार्ग मोकळे होतील. राजकीय क्षेत्रात पुढारीपणा कराल. जिवलग मित्राची भेट होईल. या आठवड्यात व्यवसायासंबंधी प्रवास यशस्वी करण्यासाठी तुम्हाला एखाद्या स्त्रीची मदत मिळू शकते. कुटुंबात तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत पार्टीच्या मूडमध्ये असाल.
सिंह : अक्षय्य तृतीयेच्या दिवशी मात्र नियोजन करूनच कामाचा शुभारंभ करा, अन्यथा विलंब होऊ शकतो. अमावस्या कालावधीत घाईची कृती टाळा. दिनांक १८, १९ हे दोन दिवस असे आहेत की, चांगल्या गोष्टींपेक्षा वाईट गोष्टींचा विचार जास्त मनात येईल. तेव्हा हे दोन दिवस शांत राहून तडजोड स्वीकारा. व्यवसायात नवीन योजनांचा प्रारंभ करण्यापूर्वी आपली आवक-जावक पाहून निर्णय घ्या. उधारीचे व्यवहार टाळा. आर्थिक बाबतीत अनपेक्षित लाभ होईल. आर्थिक बाबतीत वेळ अनुकूल राहील आणि अडकलेल्या पैशाच्या बातम्याही मिळू शकतात.
कन्या : अक्षय्य तृतीयेचा दिवस अगदी आनंदाचा जाईल. अमावस्या कालावधीत वादविवाद करणे टाळा. सध्या आपली बाजू समोरच्याला पटणार नाही हे विसरू नका. त्यामुळे कोणाला कोणत्याच प्रकारचे सल्ले देत बसू नका. अन्यथा स्वत:च त्रास वाढवून घ्याल. व्यवसायात नवीन कोणतीही सुरुवात करू नका. आर्थिक बाबतीत, हा आठवडा कन्या राशीच्या लोकांसाठी अनुकूल असेल आणि भागीदारीत केलेली गुंतवणूक तुमच्या बाजूने निर्णय देईल. परिश्रम करून पद मिळविलेल्या कुटुंबातील स्त्रीकडून मदत मिळेल.
तूळ : अक्षय्य तृतीयेच्या दिवशी अनावश्यक खरेदी टाळा. अमावास्या कालावधीत सहनशीलता वाढवा. कोणतीही गोष्ट बेफिकीरपणे करणे त्रासाचे ठरेल. इतरांच्या काही गोष्टी नाही पटल्या तरी ऐकून घ्या. त्यावर आपले मत स्पष्टपणे बोलून दाखवू नका. त्यामुळे गैरसमजाचे वादळ निर्माण होऊ शकते. सप्ताहातील सर्वच दिवस जपून हाताळावे लागतील. भागीदारी व्यवसायात नवीन वाटचाल करणे टाळा. नोकरीच्या ठिकाणी परिस्थिती मुठीत वाळूसारखी सरकत राहील, काम सांभाळा. तुम्हाला कुटुंबात आनंद आणि सौहार्द मिळेल पण ते तुमच्या अपेक्षेपेक्षा कमी असेल.
वृश्चिक : या आठवड्यात तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका. दिनांक २०, २१ रोजी धरसोड वृत्ती टाळा. इतरांच्या सल्ल्याने काम करण्यापेक्षा स्वत:चे मत तयार करा. त्यामुळे नुकसान होणार नाही. बाकी दिवसांचा कालावधी चांगला जाईल. व्यवसायात चालून आलेले प्रस्ताव स्वीकारण्यापूर्वी त्याची पडताळणी करा. नोकरदार वर्गाला कामाचा अनुभव विसरून चालणार नाही. वायफळ खर्च टाळा.
धनू : दिनांक २२ रोजीचा एकच दिवस फारसा अनुकूल नसेल. बाकी दिवसांचा कालावधी चांगला जाईल. व्यावसायिक परिस्थितीत चांगले बदल घडतील. भागीदारी व्यवसायात यश मिळेल. नोकरदार वर्गाला कामाच्या बाबतीत तडजोड स्वीकारावी लागणार नाही. आर्थिक बाबतीत मागील पोकळी भरून काढाल. राजकीय क्षेत्रात वर्चस्व वाढेल. मुलांचे लाड करा, पण शिस्त बिघडू देऊ नका. स्वार्थी मैत्रीपासून लांब राहा. घरगुती वातावरण ठीक राहील. आरोग्य चांगले राहील.
मकर : या आठवडय़ात सर्व दिवसांचा कालावधी उत्तम राहील. त्यामुळे बरीच कामे हातासरशी ह़ोतील. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी जो अडथळा येत होता तो आता येणार नाही. नोकरदार वर्गाला कामामध्ये खूप कष्ट वाढतील, पण त्याचा आर्थिक लाभही होईल. त्यामुळे वाईट वाटण्याचे कारण नाही. नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. शेजारधर्माविषयी आपुलकी निर्माण होईल. संततीसौख्य लाभेल. जोडीदार खूश असेल. मानसिक समाधान लाभेल. आरोग्यात सुधारणा होईल.
कुंभ : सप्ताहात सर्व दिवस चांगले असल्यामुळे कामातील प्रगती दिसून येईल. व्यावसायिकदृष्टय़ा फायद्याचे प्रमाण चांगले राहील. इतरांचे मार्गदर्शन चांगले मिळेल. नोकरदार वर्गाला वरिष्ठांची शाबासकी मिळेल. राजकीय क्षेत्रात असणारा दुरावा कमी होईल. आर्थिक उत्कर्ष होईल. शेजारधर्माशी मात्र जेवढय़ास तेवढे राहा. घरगुती वातावरण आनंदी असेल. जोडीदार साथ देईल. मानसिक ताणतणाव कमी होईल.
मीन : अक्षय्य तृतीयेच्या दिवशी मनासारखी खरेदी कराल. दिनांक १६, १७ हे दोन दिवस कोणाच्याही भानगडीत पडू नका. आपले काम भले नि आपण भले’ असे केल्यास हे दोन दिवससुद्धा चांगले जातील. बाकी दिवसांचा कालावधी ठीक राहील. व्यवसायात आपली जबाबदारी इतरांवर टाकू नका. त्यामुळे नुकसान होऊ शकते. नोकरदार वर्गाला कामाच्या बाबतीत द्विधावस्था निर्माण होईल. आर्थिक बाबतीत बचत करा. सार्वजनिक ठिकाणी सहभाग टाळा. परिस्थिती अचानक तुमच्या अनुकूल होऊ लागेल आणि वेळ अनुकूल असेल. आर्थिक परिस्थिती थोडी नाजूक असू शकते आणि तरुण व्यक्तीवर पैसा खर्च अधिक होईल.